BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

229 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


मुंबई 

ठाकरे सरकारच्या  “या” दिग्गज नेत्याच्या   नावाने जादूटोणा………..!

ठाकरे सरकारच्या “या” दिग्गज नेत्याच्या नावाने जादूटोणा………..! 

 दोघाना रंगेहाथ अटक  

न्यूज कट्टा /  मुंबई 

एक अंधारी खोली...तांदळाच्या राशीवर एका नेत्याचा फोटो, अगरबत्तीचा धूर, हळद, कुंकू, बुक्का, लिंबू, पांढऱ्या रंगाचा एक कोंबडा अशी साहित्य ठेवून अघोरी चाललेली होती. पण हा अघोरी प्रयोग कोण्या नाम्या गोम्यावर नसून  चक्क ठाकरे सरकारच्या एका दिग्गज नेत्यावर सुरु होता. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने जादूटोणा  करीत असलेल्या दोघांना बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे तलावलीमध्ये हा सर्व प्रकार चालू होता. एका घरात तांदळात एकनाथ शिंदेंचा फोटो ठेवत अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने त्यांच्या जिवाला  धोका किंवा त्यांना शरीराला जीवघेण्या जखमा होण्यासाठी या अघोरी प्रथेचा वापर केला गेला जात असल्याचे समजते.

 शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून, हळद, कुंकू, बुक्का, लिंबू, कोंबडा यांचा वापर करुन अघोरी प्रयोग सुरु होता. पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडलं आहे. बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, कृष्णा बाळू कुरकुटे आणि संतोष मगरु वारडी या दोघांना अटक केली असून पोलीस या मागचा खरा सुत्रधार कोण ? याचा तपास करत आहेत. 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links