BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

14141 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


मोहाडी

४  वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार 

ब्रेकिंग 
४  वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार 

मोहाडी तालुक्यातील मांढळ येथील घटना  

न्यूज कट्टा / भंडारा 

हवन कार्यासाठी शेजारच्या घरी गेलेल्या  एका ४ वर्षीय चिमुकालीवर अतिप्रसंग केल्याची घटना गुरुवार दि. १७ रोजी दुपारच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील मांढळ येथे घडली . बलात्कार करणाऱ्या नराधमाला मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मांढळ गावातील पीडित मुलगी आणि आरोपी, वय वर्ष ३१, हे शेजारी शेजारी राहतात. घटनेच्या दिवशी पीडीत मुलगी घराशेजारी सुरु असलेल्या हवन कार्यक्रमासाठी गेली होती. त्यानंतर प्रसादासाठी भावाला घेवून येते म्हणून घरी परत आली. भाऊ झोपलेला असल्याने आईने तिला 'तू प्रसाद घेवून ये ' असे सांगितले.  मुलगी पुन्हा प्रसाद घेण्याकरिता शेजारच्या घरी गेली. बराच वेळ ती परत न आल्याने आईने शोध सुरू केला. काही वेळानंतर  मुलगी शेजारच्या युवकासोबत घराकडे येताना दिसली. ती रडत असल्याने आईने तिला विचारणा केली असता तिने आरोपीचे नाव सांगून त्याने तिला जवळच बांधकाम सुरु असलेल्या एका घरी नेवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचे तिने आईला सांगितले. या प्रकरणाची तक्रार मोहाडी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली असून आरोपी विरुद्ध ३७६,ए,बी, भांदवि, सहकलम ४,६,८, बाललैन्गिक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलीस नायक मिथुन चांदेवार करीत आहेत. 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links