BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

96 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

परवाना धारकांकडे असलेली शस्त्रे जमा करावी

परवाना धारकांकडे असलेली शस्त्रे जमा करावी

न्यूज कट्टा / भंडारा 

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 11 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेला आहे. त्या संबधात संपुर्ण जिल्ह्यात आदर्श आचार संहितेची अंमलबजावणीची कार्यवाही सुरु झाली आहे. निवडणूक आचार संहितेच्या अनुषंगाने परवाना धारकांकडे असलेली शस्त्रे जमा करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहे.

            एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्राम पंचायातीची सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया आयोगाचे निर्देशाप्रमाणे पार पाडता यावी याकरीता जिल्ह्यातील परवानाधारकांकडे असलेली शस्त्रे जमा करण्याबाबत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आदेशात नमुद केले आहे. या आदेशाव्दारे भंडारा जिल्ह्यात सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेश हा आचार संहितेच्या कालावधी 11 डिसेंबर 2020 ते 21 जानेवारी 2021 रात्री 12 वाजेपर्यंत अमंलात राहील. या कालावधीमध्ये सर्व परवानाधारकांनी त्यांचेकडे असलेले शस्त्रास्त्रे संबधीत क्षेत्राचे पोलिस स्टेशन आधिकारी यांचेकडे तात्काळ जमा करावी.

            हा आदेश बँकाच्या सुरक्षेकरीता नेमण्यात आलेले सुरक्षा रक्षक, पोलिस विभागात कार्यरत असलेले कर्मचारी त्यांना विभागामार्फत पुरविण्यात आलेल्या शस्त्रांच्या बाबतीत लष्करी/ निमलष्करी जवानांकडील शस्त्रास्त्रे, मॅगनिज ओअर इंडीया लिमिटेड यांचेकडील सुरक्षा रक्षक तसेच जे समाज दिर्घकालीन स्थायी कायदा, रुढी व परिपाठ यानुसार शस्त्रास्त्रे बाळगण्यास हकदार असेल त्या समाजाला लागू राहणार नाही. तथापी अशा समाजातील व्यक्ती हिंसाचारात सहभागी असल्याचे आढळून आल्यास व निवडणूका शांततेच्या मार्गाने पार पाडण्यास अडथळा निर्माण करत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तींची शस्त्रास्त्रे अडकवून ठेवण्यास जिल्हा प्रशासनास कोणताही प्रतिबंध असणार नाही. असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links