BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

125 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


सोलापूर

…अखेर ‘त्या’ नरभक्षक बिबट्याचा खात्मा, ‘या’ शार्पशूटरने केले ठार

…अखेर ‘त्या’ नरभक्षक बिबट्याचा खात्मा, ‘या’ शार्पशूटरने केले ठार

शार्प शूटर, पोलीस यांच्या मदतीने रात्रंदिवस करमाळा तालुक्यात त्याच्या शोधासाठी गस्त घातली जात होती

न्यूज कट्टा / सोलापूर 

अमदनगर, बीड, सोलापूर या तीन जिल्ह्यांत नऊ जणांना ठार करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर आज ठार करण्यात आलं आहे. नरभक्षक बिबट्याला बेशुद्ध करून पकडणे किंवा ठार करण्याचे आदेश वनविभागाच्या वतीने देण्यात आले होते, त्यामुळे गेल्या दोन डिसेंबरपासून करमाळा तालुक्यात वनविभागामार्फत  नरभक्षक बिबट्याचा शोध सुरू होता, दोन तारखेचा मध्यरात्रीपासून वनविभाग, शार्प शूटर, पोलीस यांच्या मदतीने रात्रंदिवस करमाळा तालुक्यात त्याच्या शोधासाठी गस्त घातली जात होती.

उजनी जलाशयाच्या बॅक वॉटरला मोठ्या प्रमाणात असलेल्या उसाच्या आणि केळीच्या शेतीमुळे या नरभक्षक बिबट्याला शोधणे मोठे आव्हान बनले होते, मात्र अखेर आज बिबट्याला ठार करण्यात यश आलं आहे. करमाळा तालुक्यातील वांगी शिवारातील राखुंडे यांच्या केळीच्या शेतात बिबट्या आढळल्यानंतर त्याला शार्प शूटर चंद्रकांत मंडलिक यांच्या टीममधील सदस्यांनी गोळी घालून ठार केले, बिबट्या ठार झाल्याच्या बातमीने दहशतीत वावरणार्‍या करमाळा तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, नरभक्षक बिबट्याने अहमदनगर, बीड आणि सोलापूर जिल्ह्यांतील करमाळा तालुक्यांत अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

 

 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links