BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

179 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

51 पोलिसांनी केले प्लाझ्मा दान

कर्तव्यासह पोलिसांनी जपले सामाजिक भान

51 पोलिसांनी केले प्लाझ्मा दान

न्यूज कट्टा / भंडारा 

कायदा व सुव्यवस्था तसेच सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या भंडारा पोलीस विभागाने कोरोना रुग्णासाठी जीवनदान ठरणारा प्लाझ्मा दान करण्यामध्येही पोलीस विभागाने पुढाकार घेऊन कर्तव्यासोबतच सामाजिक भान जपले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित प्लाख्मा दान शिबिरात प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. पोलीस विभागाच्या या सामाजिक कार्याबद्दल जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी प्लाझ्मा दान करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

             कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे बाधित रुग्णांना प्लाझ्मा हा जीवनदान ठरणारा आहे. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान साठी पात्र असतात. टाळेबंदीच्या काळात पोलीस विभागाने अतिशय जोखमीचे कर्तव्य बजावले. त्यामुळेच भंडारा जिल्ह्यातील पोलीस विभागातील अनेक अधिकारी कर्मचारी  कोरोना पॉझिटिव्ह आले. या लोकांनी आपला प्लाझ्मा दान करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले होते. या आवाहनाला पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फुर्तपणे पुढाकार घेऊन 51 च्या वर कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान करून विक्रम केला आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले.

            प्रत्येकच बाधित होऊन गेलेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा परिणामकारक ठरेल, याची श्वाश्वती नसल्याने प्रारंभी अशा व्यक्तींच्या शरीरातील आरबीडी व ॲण्टीबॉडीची तपासणी करण्यात येते. एका विशिष्ट पातळीपर्यंत याचे प्रमाण आढळल्यानंतर संबंधित व्यक्तीचा प्लाझ्मा उपयुक्त ठरू शकतो की नाही, याचे निदान केले जाते. दरम्यान प्लाझ्मा लक्षात घेता जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या कल्पनेतून प्लाझ्मा दान शिबिराची संकल्पना पुढे आली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि लाईफ लाईन रक्तपेढी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवस भंडाऱ्यात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

            या शिबिरात पोलीस मोठ्या  प्रमाणात नोंदणी केली आणि मोठ्या संख्येने पोलीस प्लाझ्मा दानासाठी पात्र ठरले व त्यांनी प्लाझ्मा दान केला. पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम व प्रमोद डोंगरे यांनी यासाठी खूप मेहनत घेतली. उपजिल्हाधिकारी अर्चना यादव यांनी यासाठी उत्तम समन्वय साधला. तर लाईफ लाईन रक्त पेढीचे डॉ. हरीश वरभे व त्यांच्या चमुनी अतिशय नेटके नियोजन केले. या कार्यासाठी  जिल्हाधिकारी संदीप कदम यांनो पोलीस विभागाचे अभिनंदन केले आहे.

प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन

             प्लाझ्मा दान शिबिर रविवारी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात असून नागरिकांनी आरबीडी व ॲण्टीबॉडीची तपासणी तपासणी करून  प्लझ्मा दान करण्याचे  आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. हा प्लाझ्मा शासकीय रुग्णालयात निशुल्क देण्यात येणार आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links