BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

280 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

''या'' ग्रामपंचायतीचे तब्बल १२७ मतदार मतदानापासून वंचित 

ग्रामपंचायत निवडणूक ....
जेव्हा निवडणूक अधिकारीच मतदार यादीत घोळ करतात तेव्हा ......

''या'' ग्रामपंचायतीचे तब्बल १२७ मतदार मतदानापासून वंचित 

निवडणूक मतदार यादीत घोळ,  नावांची अदलाबदल 

न्यूज कट्टा / कविता मोरे / नागापुरे 

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदार अंतिम यादी वाचनानंतर आता मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप होऊन तक्रारी सुरू झाल्या आहेत. 

मतदार नोंदणी आणि मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता सर्वाधिक जनजागृती करणाऱ्या निवडणूक यंत्रणेनेच यादीत घोळ केल्याने आता अनेक मतदार इच्छुक असूनही मतदान करू शकणार नसल्याचे समोर येत आहे.  पवनी तालुक्यातील मिन्सी गट ग्रामपंचायतीतील तब्बल १२७ मतदार या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहणार आहेत. 

नावांची अदला बदल 
पवनी तालुक्यातील मिन्सी गट ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच गाजू लागली आहे. मिन्सी गट ग्रामपंचायतीमध्ये मिन्सी, भिकारमिन्सी व पन्नाशी अशा तीन गावांचा समावेश आहे.  मतदार यादीत मिन्सी गट ग्रामपंचायतचे  १४७ महिला व १२८ पुरुष अशा  एकूण २७५ मतदार नोंद आहे. यांपैकी केवळ १३३ ग्रामस्थांची नावे मतदार यादीत आली आहेत. उर्वरित १२७ मतदाराच्या नावाच्या जागी सोनेगाव आणि गोलेवाडी येथील मतदारांची नावे आहेत. मिन्सी गावाचे १३३ , भिकारमिन्सी ८ तर पन्नासीचे केवळ  ७ मतदाराची नावे यादीत आहे.   

ग्रामस्थांनी मतदार यादीवर हरकत 
भिकारमिन्सी व पन्नाशी या गावांतील मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ झाली असून त्या यादीत भंडारा जिल्ह्यातील सोनेगाव व येटेवाही या गावांतील नागरिकांची नावे समाविष्ट झाली आहेत. यादी वाचल्यानंतर ग्रामस्थांनी मतदार यादीवर हरकत घेतली आहे. प्रारुप मतदार यादीत बाहेर गावच्या मतदारांची नावे  यादीत नसतांना हा घोळ कसा झाला? हा सुध्दा एक प्रश्नच आहे. निवडणूक विभागाचे अधिकारी आता काहीच करता येत नाही असे सांगून मोकळे झाले आहेत. त्यामुळे भिकारमीन्सी व पन्नाशी येथील मतदारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. 

जेव्हा निवडणूक अधिकारीच मतदार यादीत घोळ करतात तेव्हा ......
तीन गावे मिळून आमची गट ग्रामपंचायत आहे. विधानसभा निवडणूकीच्या पन्नासी गावाचे केद्र गोलेवाडी तर भिकारमिन्सी गावाचे केंद्र सोनेगाव येथे असते. सोनेगाव आणि गोलेवाडी भंडारा तालुक्यात येते.  मात्र ही ग्रामपंचायत निवडणूक असताना आमची नावे गहाळ करून इतर नावे टाकण्यात आलीत. निवडणूक अधिकारीच मतदार यादीत घोळ करत असतील तर आम्ही काय करायचे ?
पुष्पराज लांडगे, माजी सरपंच, मिन्सी 

पुन्हा घोळ कसा काय  झाला कळत नाही
पहिली यादी प्रकाशित झाली तेव्हा मिन्सी गट ग्रामपंचायत मधील मतदाराची नावे यादीत नसून सोनेगाव आणि गोलेवाडी गावातील मतदारांची नावे आलीत असे मी तलाठी मोरे यांना सांगितले होते, त्यांनी तहसीलदार यांना याबाबत सांगितले असे ते म्हणाले मात्र पुन्हा घोळ कसा काय  झाला कळत नाही. 
निलेश जांभूळकर, ग्रामसेवक 

कुणीहीआक्षेप घेतला नाही
प्रारूप यादी प्रकाशित झाली तेव्हा कुणी आक्षेप घेतला नाही, आता अंतिम यादी जाहीर झाली असली तरी काही करता येते का ते बघत आहोत. 
मोरे, तलाठी 

 

तांत्रिक कारणामुळे घोळ 

असा काही घोळ झाला आहे याची मला कल्पना नव्हती,  प्रारूप यादीवर कुणीच आक्षेप घेतला नाही त्यामुळे हे लक्षात आले नाही. लवकर  यादी दुरुस्ती करून  सुटलेल्या सर्वांची नावे यादीत सामाविस्ष्ठ  केली जाईल. 
निलीमा रंगारी, निवडणूक अधिकारी, पवनी तालुका 

ग्रामपंचायत निवडणूक दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी होऊ घातली आहे. त्यासाठी दिनांक २३  ते ३० डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज भरायचे आहेत.
  

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links