BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

204 Views

By न्यूज कट्टा


लाखांदूर

ऐन थंडीत तापले गावगाड्यांचे राजकारण

ऐन थंडीत तापले गावगाड्यांचे राजकारण

तालुक्यात 11 ग्रामपंचायतीत राजकारण पुन्हा रंगणार

 

न्यूज कट्टा / लाखांदूर / अभिमन ठाकरे

ग्रामपंचायत निवडणुकीची अंतिम यादी जाहीर होताच लाखांदुर  तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीचे राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे. थंडीचा कडका वाढलेला असताना गावगाड्यांचे राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. 

आजवर  ग्रामपंचायत निवडणुकीची अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी किंवा दुसर्‍या दिवशी ग्रा.पं. निवडणुकीची घोषणा करण्यात येते. मात्र यावेळी निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्धीच्या दोन दिवस आधीच ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू होत आहे. त्यामुळे सर्वच इच्छूकांना आपले उमेदवारी अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह नव्याने दाखल करावे लागणार आहे.
       नविन इच्छुक उमेदवारांनाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नव्याने होणारी ही ग्रामपंचायतीची निवडणूक यावेळी चूरशीची होणार आहे.  कारण नव्यांच्या उमेदवारीमुळे, स्थगित झालेल्या निवडणूकी पूर्वीची सर्व राजकीय समिकरणे यावेळी बदलणार आहेत.

      मार्च २०२० च्या ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे नविन निवडणूक प्रक्रियेतही तालुक्यात सोनी (इंदोरा), बेलाटी, पुयार, मांदेड (सावरगाव), कन्हाळगाव (चिचगाव), गुंजेपार (किन्ही), चिचाळ (कोदामेळी), पारडी, मुर्झा (मालदा), कोच्छी (दांडेगाव), चिंचोली (अंतरगाव) या ११ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. यात निवडणूकीत समाविष्ट ग्रामपंचायतींच्या ३५ प्रभागांमधून ९९ सदस्यांची निवड मतदान प्रक्रियेव्दारे होणार आहे. निवडून आलेले ११ ग्रामपंचायतींचे हेच सदस्य आपल्या-आपल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड करतील. कारण यावेळी सरपंच निवडणूक ही निवडून आलेल्या सदस्यांमधून होणार आहे. 
          सरपंचाची थेट निवडणूक यावेळी होणार नाही. नोव्हेबर मध्येच ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया नव्याने होणाऱ्यांची चाहूल लागताच इच्छुक उमेदवार कामाला लागले आहे. मागच्या वेळी काही कारणास्तव उमेदवारी दाखल न करू शकणाऱ्यांनी यावेळी नव्याने कंमर कसली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यासाठी अशा नविन इच्छुक उमेदवारांची सध्या तहसिल कार्यालयात गर्दी दिसून येत आहे. 

राज्यातील राजकीय समीकरणाचा असर या निवडणुकीवर असेल की तालुक्यातील सर्वच पक्ष आपली स्थानिक शक्ती आजमावण्यासाठी स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवतील. याचे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट होईल. त्यानंतरच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत खरी रंगत दिसून येणार

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links