BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

100 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा

अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा

डॉ. कलाम यांचे योगदान देश कधीच विसरू शकत नाही- डॉ. विकास ढोमणे

 

न्यूज कट्टा / भंडारा 

"भारतात विविध जाती धर्माचे लोक एकतेने राहतात. भारतीय अल्पसंख्यांक समाज हा भारतात अत्यंत सुरक्षित आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी भारत सरकारने विविध अल्पसंख्यांक महाविद्यालय सुरू केले असून शासन त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. एक आदर्श असे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे योगदान देश कधीच विसरू शकत नाही," असे डॉ. विकास ढोमणे, प्राचार्य, जेएम पटेल महाविद्यालय यांनी सांगितले. जेएम पटेल महाविद्यालय व धरमपेठ एमपी देव  विज्ञान महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आभासी साजरा करण्यात आलेल्या अल्पसंख्यांक हक्क दिवस कार्यक्रमात स्वागतपर भाषणात ते बोलत होते.

डॉ. अखिलेश पेशवे, प्राचार्य, धरमपेठ एमपी देव विज्ञान महाविद्यालय नागपूर, यांनी भारतीय समाज हा विविधतेने नटलेला असला तरी भारत हा एकसंघ आहे असे सांगितले.

याप्रसंगी बोलताना तज्ञ मार्गदर्शक डॉ. निहाल शेख, सहाय्यक प्राध्यापक, संताजी महाविद्यालय नागपूर  यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व घटना समितीच्या सदस्यांनी भारतीय घटना तयार करतांना सर्वांना समान अधिकार असतील व  भारतीय संविधानात सर्व जाती धर्माच्या लोकांना आपली  भाषा, संस्कृतीची जपणूक करण्याचे प्रावधान  केले आहे. "सर्व भारतीय नागरिकांनी आपली कर्तव्ये पार पाडतांना कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी," असे प्रतिपादन डॉ. निहाल शेख यांनी केले. पुढे बोलताना डॉ. शेख म्हणाले की जगात भारत हा एक विशिष्ट देश आहे ज्यात लहानात लहान अल्पसंख्यांकांना सुरक्षितता प्रदान करून सर्वांना समान अधिकार देण्यात आलेले आहेत.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. कार्तिक पनिकर, समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता व निर्धारण कक्ष यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. वर्षा रंगारी, समन्वयक, मूल्य वर्धन समिति, धरमपेठ एमपी देव विज्ञान महाविद्यालय नागपूर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रत्नाकर लांजेवार, समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता व निर्धारण कक्ष, धरमपेठ एमपी देव विज्ञान महाविद्यालय नागपूर व जेएम पटेल महाविद्यालय भंडारा येथील अंतर्गत गुणवत्ता व निर्धारण कक्षाचे सर्व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links