BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

99 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

सत्याग्रह आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 

सत्याग्रह आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 
सत्याग्रह आंदोलनाला 7 दिवस पूर्ण 
शिक्षणाधिकारी, मुकाअ यांचेकडून कोणतीही दखल नाही

 

न्यूज कट्टा / भंडारा 

शिक्षा बचाओ आंदोलन समिती तर्फे सीबीएसई शाळांच्या विरोधात भंडारा जिल्हा परिषदेसमोर मागील 7 दिवसांपासून सुरू असलेल्या सत्याग्रह आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करील असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. सीबीएसई शाळांच्या गैर कारभारा विरोधात सुरु असलेल्या ह्या आंदोलनाला पालकवर्ग व समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी समर्थन दिले आहे.

महाराष्ट्र शुल्क आधिनियम 2014 चे सर्रास उल्लंघन आणि शिक्षणाचा हक्क कायद्याचा गैरवापर केल्याचे आरोप शिक्षा बाचाओ समितीने केले आहे. भंडारा जिल्ह्यातील अनेक सीबीएसई शाळांनी मुख्याध्यापक किंवा शिक्षकांच्या पद भरतीला मान्यता घेतले नसल्याने शाळेचे कामकाज बोगस ठरले आहे. या शाळेनी पालकांकडून आज पर्यंत घेतलेली संपूर्ण फीस व्याजसह परत करण्याची मागणी आंदोलक करत आहेत.

सत्याग्रह आंदोलनकर्त्यांनी मागणी केली आहे की दोषी शाळांवर दंडात्मक कार्यवाही केली जावी. शाळा अवैध घोषित करुन प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी. सीबीएसई शाळेने मुख्याध्यापकाची नियुक्तीच न केल्याने विद्यार्थ्यांच्या टीसीवर सही करणारे कोण याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे. तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषद शिक्षण विभागा मार्फत नियमानुसार घेण्यात यावी अशी मागणीही समितीने केली आहे.

नागपूर च्या नारायण विद्यालयम व हिंगणघाटच्या भवन्स सीबीएसई शाळेवर 11 करोड़ रुपये दंड वसूलिची कार्यवाही करण्यात आली. अशीच कार्यवाही भंडारा येथील सेंट पिटर, सनिज स्प्रिंग डेल स्कूल, महर्षी विद्या मंदिर, रॉयल पब्लिक स्कूल सोबतच ईतर अनेक शाळांवर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.

सत्याग्रह आंदोलनास अनेक संघटना व विशेष व्यक्तींनी समर्थन दिले आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाअध्यक्ष शिवराम गिर्हेपुंजे, तुमसर चे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, जय जवान जय किसान संगठणेचे सचिन घनमारे, भाजपा चे कल्याणी भुरे, विजया नंदुरकर, कांग्रेस चे धणराज साठवने यांसह अनेकांनी भेट देवून सत्याग्रह आंदोलनास समर्थन दिले आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links