BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

129 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


पवनी

अखेर त्या  ग्रामपंचायतीच्या  मतदारांची नावे यादीत 

ग्रामपंचायत निवडणूक ....

न्यूज कट्टाच्या बातमीचा impact

अखेर त्या  ग्रामपंचायतीच्या  मतदारांची नावे यादीत 

न्यूज कट्टा / कविता मोरे / नागापुरे 

पवनी तालुक्यातील मिन्सी गट ग्रामपंचायतीतील तब्बल १२७ मतदार या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहणार अशी बातमी न्यूज कट्टाने १९ डिसेंबर रोजी प्रकशित केली होती. या बातमीची दाखल घेत प्रशासनाने कारवाई करीत अदलाबदल झालेल्या १२७ सह इतर मतदारांची नावे यादीत समाविष्ट केल्याने आता या सर्व मतदारांना मतदान करता येणार आहे.
 
ग्रामपंचायत निवडणूक दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी होऊ घातली आहे. त्यासाठी दिनांक २३  ते ३० डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज भरायचे आहेत. पवनी तालुक्यातील मिन्सी गट ग्रामपंचायतीमध्ये मिन्सी, भिकारमिन्सी व पन्नाशी अशा तीन गावांचा समावेश आहे.  मतदार यादीत मिन्सी गट ग्रामपंचायतचे  केवळ १३३ ग्रामस्थांची नावे मतदार यादीत आली होती. उर्वरित १२७ मतदाराच्या नावाच्या जागी सोनेगाव आणि गोलेवाडी येथील मतदारांची नावे होती. भिकारमिन्सी व पन्नाशी या गावांतील मतदारांच्या नावाएवजी त्या यादीत भंडारा जिल्ह्यातील सोनेगाव व येटेवाही या गावांतील नागरिकांची नावे समाविष्ट झाली होती. यादी वाचल्यानंतर ग्रामस्थांनी मतदार यादीवर हरकत घेतली होती. ही बातमी न्यूज कट्टाने प्रकशित केली होती.या बातमीची दाखल घेत अखेर २३ डिसेंबर रोजी नवीन यादी प्रकाशित करून सुटलेल्या माद्दरांची नावे समाविष्ट करण्यात आली आहे. 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links