BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

74 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

" झिंगल बेल झिंगल बेल" गाणारा ‘सांताक्लॉज’ आहे तरी कोण ? 

ख्रिसमस विशेष 
" झिंगल बेल झिंगल बेल" गाणारा ‘सांताक्लॉज’ आहे तरी कोण ? 

‘सांताक्लॉज’ तयार होण्यामागची ही आहे गोष्ट…

न्यूज कट्टा ब्यूरो

समाजाला प्रेमाची आणि मानवतेची शिकवण देणारे  येशु ख्रिस्त हे एक महान व्यक्ती होते.  त्यांनी जगभरातील लोकांना प्रेमाने, आपुलकीने, सद्भावनेने राहण्याचा संदेश दिला. येशुख्रिस्त यांना देवाची संतान मानले जाते. मात्र त्या काळामध्ये शासन कर्त्यांना येशुख्रिस्तांचे संदेश पसंत पडले नाहीत, त्यामुळे येशुना सुळावर लटकवले. मात्र त्यानंतर येशु ख्रिस्त पुन्हा जिवंत झाल्याचे ख्रिश्चन बांधव मानतात. हा आनंद साजरा करण्यासाठी ख्रिसमस म्हणजे नाताळ सण साजरा केला जातो.  

उद्या २६ डिसेंबर म्हणजे ख्रिसमस. नाताळ हा सण फक्त भारतातच नाही तर विदेशातसुद्धा उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी एक व्यक्ती साऱ्याचे लक्ष वेधून घेण्यास यशस्वी होते. लाल रंगाचे कपडे घातलेली, पाठीवरती वेगवेगळ्या भेटवस्तू, चॉकलेट्सने भली मोठी भरलेली पिशवी घेऊन मस्तपणे गाणे म्हणत फिरणारी व्यक्ती म्हणजे ‘सांताक्लॉज’. ज्याची सर्वजण वाटच पाहत असतात.

पण हा ‘सांताक्लॉज’ नक्की आहे कोण माहितीये? या मागे पण एक गोष्ट आहे ती अशी की…

एका नगरात निकोलस नावाचा श्रीमंत माणुस राहत असतो. तो व्यक्ती पैशांसोबत मनाने सुद्धा गर्भश्रीमंत होता. त्या व्यक्तीच्या मनामध्ये सगळ्यांसाठी प्रेम, दया, आपुलकी होती. एकदा निकोलस सहज रस्त्याने फेरफटका मारत जात होता तेव्हा अचानक त्याच्या कानावर एका मुलीचा रडण्याचा आवाज आला. ती मुलगी तिच्या वडिलांना सांगत होती की, ‘आई खूप आजारी आहे आपल्याला तिच्यासाठी औषध आणावी लागतील पण आपल्याकडे पैसे नाहीयेत. औषधी कसं आणायचं? कारण आपल्या घरात खाण्याचे सामान आणण्याकरता देखील पैसे उरले नाहीत. आता काय करायचं?’, अशा हताश स्वरात ती वडिलांना प्रश्न करत होती.

तिची आणि त्या कुटुंबाची तशी परिस्थिती पाहून निकोलसला तिची दया आली आणि त्या रात्री त्याने गुपचूपच येऊन त्या घराच्या दाराजवळ खाण्याचे थोडेसे सामान आणि काही चांदीचे शिक्के ठेवुन निघून गेला. जेव्हा दुसऱ्या दिवशी त्या मुलीने आणि तिच्या वडिलांनी ते सर्व सामान आणि शिक्के पहिले आणि त्या क्षणी आश्चर्य व्यक्त केले.  प्रभुची आपल्यावर कृपा झाल्याचा त्यांचा ठाम विश्वास बसला. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. मग ज्यांना गरज होती अशा गरजू लोकांनी आपापल्या घराबाहेर देखील पिशव्या टांगुन ठेवल्या आणि हे जेव्हा निकोलसला समजले की, आणखी लोकांना मदतीची गरज आहे तेव्हा त्याने ठरवले की, ‘मी कोणालाही निराश करणार नाही’ ...आणि मग त्याने प्रत्येकाच्या पिशव्यांमधे काही ना काही वस्तु किंवा पैसे, खाण्याचे सामान अशा  प्रकारच्या गोष्टी टाकायला सुरुवात केली. काही दिवसानंतर लोकांना निकोलस हे सर्व करत आहेत हे कळलं आणि तेव्हांपासुन लोक त्यांना ‘संत निकोलस’ असे म्हणुं लागले आणि संत निकोलस हळूहळू ‘सांताक्लॉज’ या नावाने सुप्रसिद्ध झाले. 

गोव्यामध्ये नाताळ वेगळ्या पध्दतीने साजरा करतात. गोव्यामध्ये पर्यटक देश विदेशातुन येथे येतात आणि नाताळ साजरा करतात. यावेळी गोव्याचे चित्र हे बघण्यासारखे असते. सगळीकडे एक वेगळाच उत्साहच पाहायला मिळतो. समुद्रकिनारे, माणसांच्या गर्दीने भरून जातात. तेथे अनेक जुने चर्चेस आहेत त्यामुळे तेथे सगळीकडे आकर्षक रोषणाई दिसते ती लक्षवेधी ठरते. या दिवशी चर्चमधे विशेष प्रार्थना होते. सगळेजण आपल्या नातेवाईंकांना आणि मित्रमंडळींना भेटण्याकरता एकमेकांकडे जातात, भेटवस्तूंची देवाण घेवाण होते. हा सण वर्षाअखेर डिसेंबर महिन्यात 25 तारखेला येतो. त्यामुळे ख्रिसमसचे कार्यक्रम हे नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंत चालूच राहतात. या कार्यक्रमांमधे प्रभु येशुच्या जन्मप्रसंगाची नाटीका सादर केली जाते. प्रभु येशुची गितं गायली जातात. अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात व प्रार्थना म्हटल्या जाते.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links