घोड कुठे अडलंय ? नवीन धान खरेदी केंद्र सुरू होईना ...!
सावधान ! तुमच्या गावात एजंट फिराताहेय ...
न्यूज कट्टा / भंडारा
१००० ते १२०० टनच्या वर एक धान खरेदी केंद्र ह्वायला हवे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी यासाठी एक आराखडा तयार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. पूर्वी भंडाऱ्यात ५ केंद्र होते आता नवीन आराखड्यामुळे जवळपास २२ केंद्र भंडारा तालुक्यात होतील. |
भंडारा जिल्ह्यात नवीन धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या मंजुरीची गरज आहे. मात्र अद्यापही पालकमंत्रांनी शिक्कामोर्तब न केल्याने नवीन धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे याचा फायदा घेत शेतकऱ्यांना कमिशन देवून लुटणारी टोळी सक्रीय झाली आहे. हे एजंट प्रशासनाचेच लोक असल्याचेही बोलले जात आहे.
ऑक्टोबर महिन्यात काही धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले मात्र त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने काम थांबले. पूर्वी जिल्हाधिकारी धान खरेदी केंद्राना मंजुरी देत असत मात्र आता हा अधिकार पालकमंत्र्यांकडे आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये नवीन धान खरेदी केंद्र सुरु ह्वायला हवे होते. मात्र अजुनही मुहूर्त निघत नसल्याने केंद्रावर धान घेवून येणारे शेतकरी आल्या पावली परत जातात. या सर्वांचा फायदा घेणारे काही एजंटची टोळी सध्या गावांमध्ये सक्रीय झाली आहे. शेतकऱ्यांना कमिशन देवून त्यांचे धान विक्री करून देण्याचे आमिष दाखवत हे एजंट शेतकऱ्यांची लुट करीत आहेत.
असाच प्रकार भंडारा तालुक्यातील एका केंद्रावर दिसून आला.. भंडारा येथून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या खोकरला परिसरात सध्या हे एजंट धुमाकूळ घालत आहेत. भंडारा तालुक्यातील खोकरला हे एक शासकीय धान खरेदी केंद्र आहे. मात्र प्रशासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणामुळे अजूनही खोकरला येथिल धान खरेदी केंद्र अजूनही सुरु झालेले नाही. शेतकऱ्यांचे धान निघाल्यावर केंद्र सुरु होणे गरजेचे असून नोव्हेंबर महिन्यातच हे केंद्र सुरु होणे अपेक्षित होते. मात्र सध्या या केंद्रावर शुकशुकाट असून धान खरेदी केंद्र बंद अवस्थेत आहे.
विशेष म्हणजे काही एजंट कमिशन देवून त्यांचे धान विक्री करून देतो असे सांगून १०० रुपये किलोला ५० रुपये कमिशन घेवून त्यांचे धान विक्रीस मदत करत आहेत. हा सर्व प्रकार थांबवून लवकरात लवकर खोकरला येथील शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
पालकमंत्र्यांनी मंजुरी देताच नवीन केंद्र सुरु होणार - आ. नरेंद्र भोन्डेकर
माझ्या विधानसभेत नवीन धान खरेदी केंद्र मंजूर होण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. मागील वर्षीही मी यासाठीच लढलो. सध्या भंडारा तालुका ५ आणि पवनी ९ अशा १४ केंद्राना मंजुरी आहे. पालकमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखविताच नवीन केंद्र सुरु होतील. नवीन आराखड्यानुसार जवळपास भंडारा तालुक्यात २२ केंद्र आणि पवनी तालुक्यात २१ असे जवळपास ४३ नवीन केंद्र सुरु होतील.
प्रशासनाने याची गंभीर दाखल घेणे गरजेचे
कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा वाजता मी माझे धान घेवून खोकरला येथील शासकीय धान खरेदी केंद्रावर गेले. मात्र तेथे कुणीही नव्हते. दुसऱ्यांदा आम्ही अशाप्रकारे परत आलो. खर्च करून धान केंद्रावर न्यायचा आणि धान खरेदी केंद्र बंद आहे म्हणून परतायचे. हे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. मी यासंबधी निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. प्रशासनाने याची गंभीर दाखल घेणे गरजेचे आहे.
डॉ. नितीन तुरास्कर, सदस्य जिल्हा ग्राहक परिषद ,भंडारा
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'