रोटरी क्लबची एक उबदार भेट
न्यूज कट्टा / भंडारा
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा जयजयकार करून अत्यंत प्रसन्न वातावरणात पिटेझरी या आदिवासी बहुल गावात 100 उत्तम दर्जाची नवीन ब्लँकेट्स वाटण्यात आली.
पिटेझरी गावाचे पोलिस पाटील उमराव भलावी यांच्या हस्ते पहिलं ब्लँकेट गोपिका वसंत सयाम यांना भेट देण्यात आलं. या कार्यक्रमाला सुमारे 125 गावकरी उपस्थित होते. प्रत्येक लाभार्थीचे संपूर्ण नाव लिहून स्वाक्षरी व अंगठा घेतल्यानंतरच ब्लँकेट्स वाटण्यात आली. सोबतच उत्तम दर्जाचे कपडे ज्यात साड्या, शर्ट, पॅन्ट आणि लहान मुलामुलींचे कपडे वाटण्यात आले.
सुंदर अशी भेट अचूक वेळेला, अचूक ठिकाणी पोहोचविण्याची संधि 'निसर्गवेध' न्यासाला उपलब्ध करून दिल्याबद्दल 'निसर्गवेध' तर्फे किरण पुरंदरे व अनघा पुरंदरे यांनी रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाउनचे मनापासून आभार मानले.
क्लबच्या अध्यक्षा डॉ. रेखा रवींद्र महाजन यांनी 'दिवाळी कपडे वाटप' या योजनेअंतर्गत ही सुदार भेट गोंड आदिवासी बांधवांना दिली. आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ उपशाखा पिटेझरीच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदत केली.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'