BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

101 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा 

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार 

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार 
चारगाव मार्गावरील घटना 
न्यूज कट्टा/ भंडारा 
 राष्ट्रीय महामार्ग 6 चारगाव बीट मार्गावर भ्रमण करीत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याची घटना २४ डिसेंबर रोजी पाहटे ३ वाजता घडली आहे. 

राष्ट्रीय महामार्ग 6 विर्सी उकाटा फाट्याजवळ कक्ष क्र. १९४ एफडीसीएम चारगाव बीट मार्गावर भ्रमण करीत असताना अज्ञात वाहनाने एका  २ वर्षाच्या मादी बिबटला जोरदार धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती टोलनाक्यावरील कर्मचार्यांनी वन विभागाला दिली.  माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी वन क्षेत्राधिकारी चव्हाण, आरओ राठोड आणि बिटरक्षक घटना स्थळी पोहचले.

पंचनामा केल्यानंतर शासकीय वाहनाने गडेगाव एफडीसीएम आगारात शवविच्छेदानाकरिता नेण्यात  आले. गडेगाव येथील पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.  गुणवंत भडके, लाखनीच्या  पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.. देशमुख यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links