BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

70 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना ‘नवसंजीवनी’

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना ‘नवसंजीवनी’

·         पथविक्रेता सहाय्य अभियाना अंतर्गत जिल्हयात 2170 लाभार्थ्यांचे आवेदन

·         लाभार्थांना 91 लाख 74 हजाराचे कर्ज वाटप

·         कर्ज वाटप प्रक्रिया अद्यापही सुरु पथविक्रेत्यांना लाभ घेण्याचे आवाहन

न्यूज कट्टा / भंडारा

कोव्हीड-19 (कोरोना) रोगाच्या संकटात संरक्षणाचा एक भाग म्हणुन संपुर्ण देशात (लॉकडाऊन) संचारबंदी करण्यात आली होती. त्याचा मोठा विपरीत परिणाम देशासह राज्याच्या अर्थव्यवस्थेवर तर झालाच मात्र सर्वसामान्य नागरीकांवर सुध्दा दिसुन आला. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या हातचे काम गेले. तर काहींना नाईलाजास्त जिवासाठी स्वतःचे काम सोडावे लागले. शहरामध्ये हातावर पोट असलेल्या पथविक्रेत्यांना तर लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका बसला. पथविक्रेत्यांना लॉकडाऊनमध्ये घरातच राहावे लागले. अशा अनेक घटकांचा पोटापाण्याचा प्रश्न अजुनही सुटलेला नाही. मात्र केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना दिलासा मिळाला असुन ही योजना पथविक्रेत्यासाठी ‘नवसंजीवनी’ ठरीत असल्याचे चित्र सध्या शहरामध्ये दिसुन येत आहे.

           पथविक्रेता सहाय्य अभियाना अंतर्गत ‘आर्थिक सक्षमीकरण...पथविक्रेत्यांचे सबलीकरण’ करण्यासाठी ही योजना जिल्हयात राबविली जात असुन आजघडीला जिल्हयातील 2 हजार 170 पथविक्रेत्यांनी या योजनेकरीता आवेदन अर्ज सादर केले असुन प्रत्येकी 10 हजार रुपये अशा जवळपास 1 हजारापेक्षा अधिक  लाभार्थांना एकुण 91 लाख 74 हजार रूपयांचे कर्ज मंजुर करुन सदर रक्कम लाभार्थांच्या बँक खात्यामध्ये वळती करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत भंडारा शहरातील 725 लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले असुन चारशेच्यावर लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत 34 लाख 74 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले विशेष.

कोरोना आणि लॉकडाऊनचा विविध घटकांवर परिणाम झाला. अर्थव्यवस्था डळमळीत झाली. त्यातुन मार्ग काढत एकेक घटकाला उभारी देण्याचे काम चालू आहे. केंद्र सरकारने पथविक्रेता सहाय्य अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री स्वनिधी योजना नगरपालीका, नगर पंचायतीच्या माध्यमातून राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत भंडारा जिल्हयाला 2520 पथविक्रेत्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत  पथविक्रेत्याला 3 टक्के व्याजदरावर 10 हजार रूपयाचे कर्ज एका वर्षाच्या मुदतीसाठी बँकेतुन दिले जाते आणि तेही 7 टक्के अनुदानासह. विशेष म्हणजे मुदतीत कर्ज फेडणाऱ्यांना यानंतर वाढीव स्वरूपाचे कर्ज दिले जाणार आहे. कालावधीत कर्जाची परतफेड केल्यास वाढीव कर्ज प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत एका वर्षाकरीता दिले जाणारे 10 हजाराचे कर्ज दिलेल्या कालावधीत फेडल्यास त्या लाभार्थांना नव्याने वाढीव कर्ज दिले जाणार आहे. पथविक्रेत्यांना अशा प्रकारे कर्ज सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे पथविक्रेत्यांना ‘अच्छे दिन’ आले असेच म्हणावे लागेल.

डिजीटल व्यवहारावर 1200 रुपये परतावा 10 हजारांचे कर्ज मिळाल्यानंतर पथविक्रेत्याने पूर्ण वर्षभर ऑनलाईन व्यवहार करणे आवश्यक आहे. जो पथविक्रेता ऑनलाईन व्यवहार करेल त्याला 1200 रूपये परतावा मिळणार आहे. म्हणजे अनुदानाचे 700 रूपये व 1200 रूपये परतावा असा एकुण 1900 रूपयाचा फायदा हा पथविक्रेत्यांना होणार आहे.

विशेष म्हणजे मुदतीत कर्ज फेडणाऱ्यांना यानंतर वाढीव स्वरूपाचे कर्ज दिले जाणार आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडऊनच्या काळात अनेकांचे व्यवसाय डबघाईला आले. त्याचा सर्वाधीक फटका हा शहरातील पथविक्रेत्यांना बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय पुर्णपणे बंद असल्याने जवळ असलेले पैसे कौटूंबिक खर्च झाल्याने आता व्यवसाय कसा करावा असा यक्ष प्रश्न पथविक्रेत्यांपूढे उभा ठाकला होता. केंद्र सरकारने पथविक्रेत्यांना दहा हजार रूपयांचे अर्थसहाय्य देवुन खरोखर त्यांच्या व्यवसायास पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. - विनोद जाधव मुख्याधिकारी न.प.भंडारा

 जिल्हयात पथविकेत्यांची संख्या बऱ्यापैकी असुन कोरोना संकटात व्यवसाय पुर्णपणे बंद असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले होते. लॉकडाऊन उघडल्यानंतर नव्याने व्यवसाय सुरू करण्यास पथविक्रेत्यांना आर्थिक अडचण भासत होती. मात्र केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री स्वनिधी’ योजनेमुळे पथविक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हयात आजघडीला 2 हजार 170 पथविक्रेत्यांनी योजनेअंतर्गत कर्जाकरीता आवेदन केले असुन त्यापैकी 1 हजाराच्यावर  पथविक्रेत्यांना जवळपास 91 लाख 74 हजार रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थांना लवकरच कर्जाचे वाटप होणार असुन जिल्हयातील फुटपाथ व्यवसायीक  व फेरीवाले यांनी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेण्याकरीता संबंधीत नगर पालिका/नगर पंचायत येथे संपर्क साधावा.- प्रविण पडोळे जिल्हासमन्वयक प्रधानमंत्री स्वनिधी योजना भंडारा.

भंडारा शहरात आधार शहर उपजिविका केंद्र, मिस्कीन टँक गार्डन राजीव गांधी चौक, भंडारा येथे पीएम  स्वनिधी  योजनेचे आवेदन स्विकारण्यात येत असुन शहरातील पथविक्रेत्यांनी सदर योजनेचे आवेदन अर्ज भरण्याकरीता आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड व पासपोर्ट फोटोसह सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत संपर्क साधावा असे आवाहन  भंडारा नगर पालीकेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण पडोळे यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links