BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

601 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


नवी दिल्ली

सावधान! फ्रान्समध्ये आढळला नव्या कोरोना प्रकाराचा पहिला रुग्ण

सावधान! फ्रान्समध्ये आढळला नव्या कोरोना प्रकाराचा पहिला रुग्ण

वृत्त संस्था / नवी दिल्ली 

काही दिवसांपुर्वी ब्रिटनमध्ये नवीन करोनाचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हा विषाणू जगात पसरू नये यासाठी सावधानता बाळगण्यात येत आहे. दरम्यान, या सर्वात चिंताजनक बातमी आता समोर येत आहे. ब्रिटनमधील नवीन करोनाच्या प्रकाराचा फ्रान्समध्ये पहिला रुग्ण सापडला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

वेगाने संसर्ग होणारा करोनाचा हा नवा प्रकार अनेक देशांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर 50 हून अधिक देशांनी ब्रिटनमधील वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे.

दरम्यान फ्रान्समधील हा पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये वास्तव्यास होता. लंडन येथून 19 डिसेंबरला तो परतला होता. या रुग्णामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसून फ्रान्समधील आपल्या घऱात विलगीकरणात असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. 21 डिसेंबरला वैद्यकीय तपासणी केली असताना त्याला करोनाच्या नव्या विषाणूची लागण झाली असल्याची माहिती समोर आली होती.

फ्रान्समध्ये करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी 'कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग'ला सुरुवात केली आहे. यावेळी कोणामध्ये लक्षणे आढळली तर त्यांना विलगीकरणात ठेवले जाणार आहे.

फोटो: pixabay 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links