शिक्षण महर्षि बापुसाहेबांना आदरांजली
न्यूज कट्टा / भंडारा
राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षि प. गो. उपाख्य बापूसाहेब लाखनीकर यांच्या 19 व्या पुण्यतिथि निमित्त आज दि. 26 डिसेंबर रोजी एका कार्यक्रमात आदरांजली अर्पण करण्यात आली.
संस्था संचालित विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, लाखनी येथे यावेळी स्वर्गीय बापूसाहेबांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना संस्थेचे वर्तमान अध्यक्ष व स्वर्गीय बापूसाहेबांचे पौत्र आल्हाद भांडारकर यांनी जुन्या स्मृतींन्ना उजाळा दिला. प्रसंगी कार्यवाह अजिंक्य भांडारकर, ग्रंथपाल पवन पडोळे, अशोक धरमसारे, मधुकर श्यामकुवर आणि वाचकवर्ग उपस्थित होते.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'