BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

107 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


नवी दिल्ली

सीबीएसई परीक्षेच्या तारखांची घोषणा 31 डिसेंबरला

सीबीएसई परीक्षेच्या तारखांची घोषणा 31 डिसेंबरला

 

न्यूज कट्टा ब्यूरो 

सीबीएसई बोर्डाच्या तारखेविषयी दीर्घकाळ चाललेला संशय एकदाचा 31 डिसेंबर रोजी संपणार आहे. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी माहिती दिली आहे की, 31 डिसेंबर रोजी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा कधी घेतल्या जातील हे जाहीर केले जाईल.

शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर सांगितले आहे की बोर्ड परीक्षांविषयीची शंका आता 31 डिसेंबर रोजी संपुष्टात येईल. बोर्डाच्या परीक्षेच्या तारखांची घोषणा त्यांच्या थेट कार्यक्रमात 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी केली जाईल.

या वृत्तामुळे यंदा सीबीएसई बोर्डाची परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us



'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links