BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

222 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


गोंदिया

थोडी इंसानियत जेब में रखकर निकला किजीये साहब...

कट्टा विशेष लेख 

थोडी इंसानियत जेब में रखकर निकला किजीये साहब...

न्यूज कट्टा / गोंदिया / प्रशांत बोरसे

थोडी इंसानियत को जेब में रखकर निकला किजीये साहब,
खड़े हैं आज भी वो रास्तों पे दर्द लिए ,
अपने मन मे न जाने कितने ख्वाबो को समेटे

सुनित संचेती नावाचं एक अवलिया रसायन 20 वर्षानंतर पुन्हा संपर्कात आलं. तसे आम्ही कॉलेज लाईफ मधले चांगले मित्र. इतके चांगले की केवळ 15 रुपयांसाठी अप्पू हत्ती चौकात (आता तिथे अप्पू हत्ती नाही) रस्त्यावर आडवे पडून केलेली भांडणे मला आठवतात. मी भटक्या विमुक्त कल्याणकारी संस्थेमार्फत गोंदियातील कुडवा गावात भटक्या मांग गारुडी समाजाच्या मुलांसाठी पालावरची शाळा चालवितो हे आमच्या कॉलेज ग्रुपमुळे सुनितला माहीत होत. मधल्या काळात हेम्याने शाळेसाठी काही हातभार लावला त्यात सुनीतचाही सहभाग होता.

माझ्या पालावारच्या मुलांना काय हव नको याची चौकशी सुनीत कायम करायचा. मुले दूरवर शाळेत जातात आणि त्यांच्याकडे वाहन (सायकल) नाही हे देखील संच्याने माहिती करून  घेतले होते. मग लागला हा कामाला. आपण 10 सायकली त्या मुलांना देऊ अशी खात्री त्याने दिली.

"आपलं काम खूप छान आहे आम्हालाही त्यात काहीतरी करायचंय", अस म्हणून कामाच्या व्यापात अनेकजण विसरून जातात. आता मला त्याच काहीही वाटेनास झालय किंवा आता मला या गोष्टींची सवय झालीय. पण सुनीत त्यातला नव्हता. त्याने गोंदिया- नागपूर येथे सायकल दुकानदारांशी संपर्क करून सायकल ठरवूनही टाकल्या. मुख्य म्हणजे या सायकल्सची संख्या मारुतीच्या शेपटीसारखी वाढवतच होती.  10...12...15 शेवटी 17 वर येऊन सायकल्स थांबल्या.

योगायोगाने 23 डिसेंबर या  माझ्या वाढदिवसाच्या दिवशी १७ सायकल वस्तीवर येऊन हजर झाल्या. प्रत्येक अडीअडचणीला माझ्या पाठीशी उभे रहाणारे उमेश मेंढे,  शैलेश  चावडा, माझा सहकारी राज, आमची भटक्यांची महिला अध्यक्ष छमन आणि माझी अर्धांगिनी निर्मल यांच्या हस्ते सायकलचे वाटप तात्काळ करून टाकले.

 नवीन सायकली पाहून मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेना! ज्यांना सायकल मिळाल्या नाहीत ते मात्र आपण अजून अभ्यास केला असता तर आपल्यालाही मिळाल्या असत्या या आशेने सायकल बघत होते. 17 सायकल्स म्हणजे फार मोठं बजेट होत मात्र या पठ्ठ्याने काही मित्रांना गाठून ही सर्व रक्कम जमविली. त्यात हिमांशू बुलाख, कौस्तुभ बुलाख , कुमार चोबे, अभिजीत देशपांडे हे सोडले तर माझ्या कोणी ओळखीचेही नव्हते.  तरीही हे सर्व हात पुण्यापासून 1000 किमी दूर गोंदियातील एका कोपऱ्यात भीक मागून कचरा गोळा करून शिकणाऱ्या मुलांसाठी झटले. त्यांनी माझ्या कामावर आणि आमच्या गरिबीत दिवस काढत कचरा गोळा करत मुलांना शिकविणाऱ्या शिबारी समाजावर विश्वास दाखविला त्याला तोड नाही. 
  आमच्या मुलांच्या रापलेल्या चेहऱ्यावरील हसू, आनंद आणि आम्ही अभ्यास करून एक दिवस तुमच्या सारखे बनून दाखवू ही माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरील जिद्द ही सुनीत आणि त्याच्या मित्रांच्या कामाला मिळालेली पावती.
  
  मी सर्व शिबारी( मांग गारुडी) समाजामार्फत, भटक्या विमुक्त कल्याणकारी संस्थे मार्फत आणि माझ्या पालावरच्या शाळेतील सर्व 200 मुलांमार्फत सुनीत आणि त्याच्या बरोबर झटणाऱ्या सर्व दानशूर हातांचे मनापासून आभार मानतो.

 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links