BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

7978 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा 

जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केला प्लाझ्मा डोनरचा सन्मान

जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केला प्लाझ्मा डोनरचा सन्मान

१०१ प्लाझ्मा सामान्य रुग्णालयाला सुपूर्द
न्यूज कट्टा / भंडारा 

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व लाईफ लाईन रक्तपेढी नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबीराचे आयोजन नुकतेच भंडारा येथे करण्यात आले होते. या शिबीरात 101 व्यक्तींनी प्लाझ्मा दान करुन विक्रम केला. या सामाजिक कार्यात सहभागी झालेल्या यंत्रणांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात लाईफ लाईन रक्त पेढी नागपूरच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझडे, उपजिल्हाधिकारी अर्चना-पोळ यादव,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, मख्याधिकारी विनोद जाधव, लाईफ लाईन रक्त पेढीचे डॉ. हरिश वरभे यावेळी उपस्थित होते. कायदा व सुवस्था तसेच सामान्य व्यक्तींच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस दलातील 51 पोलीसांनी या शिबीरात प्लाझ्मा दान केला. या कार्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक यांचा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. पोलीस दलाचा हा प्रातिनिधिक सन्मान असल्याचे त्यांनी सांगीतले.

 नगर परिषद कर्मचाऱ्यांनी सुध्दा या शिबीरात मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा दान केला. यासाठी मुख्याधिकारी विनोद जाधव यांचा स्मृतीचिन्ह देऊन प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद मधील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुध्दा प्लाझ्मा दान करुन सामाजिक भान जपले. यासाठी सर्वांच्यावतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझडे यांनी स्मृतीचिन्ह स्विकारले. उपजिल्हाधिकारी अर्चना-पोळ यादव, पोलीस निरीक्षक सचिन मेश्राम व प्रमोद डोंगरे यांनी या शिबीरासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांचाही स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

लाईफ लाईन रक्त पेढीने हे शिबीर घेण्यासाठी प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल डॉ. हरिश वरभे यांचा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी विशेष सन्मान केला. शिबीरात जमा झालेला प्लाझ्मा शासकीय रुग्णालय भंडारा येथे सुपूर्द करण्यात आला. शासकीय रुग्णालयात गरजू रुग्णांना हा प्लाझ्मा मोफत देण्यात येणार आहे. रुग्णांसाठी प्लाझ्मा जीवनदान ठरणार आहे. यावेळी लाईफ लाईन रक्तपेढीचे डॉ. प्रवीण साठवणे व डॉ. भूमेष झेलबोंडे उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links