BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

23 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


अहमदनगर

राजेंद्र वाघ यांच्या माझे ज्ञानरचनावादी उपक्रम पुस्तकाचे प्रकाशन

राजेंद्र वाघ यांच्या माझे ज्ञानरचनावादी उपक्रम पुस्तकाचे प्रकाशन

न्यूज कट्टा  / अहमदनगर 

जळगाव जि. प. उच्च प्राथ. शाळा, शिंदी ता. चाळीसगाव येथील शिक्षक राजेंद्र  भाऊराव वाघ यांच्या माझे ज्ञानरचनावादी उपक्रम या कोवीड-१९ काळातील पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ शिक्षणतज्ञ, माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी राज्य संयोजक दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कृतिशील शिक्षक महाराष्ट्रचे संयोजक विक्रम अडसूळ, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नारायण मंगलाराम व नदीम खान यांचे सोबत महाराष्ट्रातील संपुर्ण कृतिशील शिक्षक महाराष्ट्र परिवार ऑनलाईन उपस्थित होते.

राजेंद्र वाघ यांनी आपल्या मनोगतात त्यांनी टाकळी प्रचा शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता बागुल व सध्याच्या शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण यांनी प्रेरणा दिली त्यातून 'माझे ज्ञानरचनावाद' ह्या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असे सांगितले. 

"आज पर्यंत विविध पुस्तकांचा अभ्यास करतांना असे पुस्तक माझ्या निदर्शनास आढळले नाही, म्हणून आपले स्वतःचे पुस्तक असावे असा ध्यास लागला. अन् मी कामाला लागलो, यासाठी राज्य संयोजक कृतिशील शिक्षक महाराष्ट्रचे विक्रम अडसूळ व जळगाव जिल्हयाचे उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे, विजय पवार, तसेच चाळीसगाव गटशिक्षणाधिकारी विलास भोई, भडगाव गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र महाजन, केंद्रप्रमुख रतिलाल जाटीया, केंद्रप्रमुख सुधाकर पाटील तसेच मोठे बंधु प्रदिप वाघ यांचेही मार्गदर्शन लाभले," असे मनोगत राजेंद्र वाघ यांनी व्यक्त केले.

शाळेत राबविलेले विविध उपक्रम व ५ ते  ७ वर्गांचा परिसर अभ्यास, सामान्य विज्ञान विषयाचा अभ्यास राज्यातील सर्व शाळांसाठी राजेंद्र वाघ नावाने युट्यूब चॅनेलवर उपलब्ध करुन दिला आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी घ्यावा, असे आवाहन वाघ यांनी याप्रसंगी केले. 

प्रकाशक कृतिशील शिक्षक महाराष्ट्र प्रकाशन, कर्जत, अहमदनगर असून मुखपृष्ठ सजावट गजानन सुरकुटवार, नांदेड यांनी केले आहे तर अक्षर जुळवणी श्रेयशी ग्राफिक्स, पुणे यांनी केले आहे. शाळेतील शिक्षक नरेश मित्रा, हिरालाल नागमोती,  गोरख वाघ, प्रल्हाद चिंचोले, प्रदिप पाटील, गणेश येवले, मुन्ना देशमुख, सविता वाघ, भारती बोरसे, रावसाहेब राठोड यांचे सहकार्य लाभले.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links