Breaking: महाराष्ट्र सुन्न
भंडाऱ्यात नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 चिमुकल्यांचा गुदमरून मृत्यू
न्यूज कट्टा /भंडारा
जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनीटमध्ये ( SNCU ) शॉर्ट सर्किटने आग लागल्याने दहा बालकांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला आहे. या शिशु केअर युनीटमधील सात बालकांना वाचविण्यात आले आहे. या घत्नेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिट मध्ये १० दिवस ते २ महिन्यापर्यंतचे बालक भारती होते. या युनीटमधून शनिवारी रात्री २ वाजताच्या दरम्यान अचानक धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूम मध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले.
अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये आउटबॉर्न आणि इन बाॅर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटर मध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले. तर अतिदक्षता नवजात शिशु केअर युनीटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला.या शिशु केअर युनीटमधील सात बालकांना वाचविण्यात आले आहे.
रुग्णालयात जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रमोद खंडाते दाखल. रुग्णालयाला पोलिसांचा वेढा असून आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल नागपूर येथून भंडारा रुग्णालयात पहाटे ५.३५ वाजता दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी संदीप कदम तसेच पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्याशी चर्चा करून तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहे
अंगावर काटा आणणारी घटना - आरोग्यमंत्री राजेश टोपे
सामान्य रुग्णालयाचा हलगर्जी पणा भोवला - खा. सुनील मेंढे
आगीच कारण शोधणार - जिल्हाधिकारी संदीप कदम
घटना अत्यंत दुर्दैवी - राहुल गांधींचे ट्वीट
पिडीत कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत राज्य सरकारच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केली आहे
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'