BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

2697 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा 

रुग्णालयात आग लागल्यानंतर कोविड पेशंटला जीएमसीएच येथे हलविल्याने मृत्यू

रुग्णालयात आग लागल्यानंतर कोविड पेशंटला जीएमसीएच येथे हलविल्याने मृत्यू : नातेवाईकांचा आरोप 

न्यूज कट्टा/ कविता मोरे नागापुरे /भंडारा 
भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात शनिवारी पहाटे लागलेल्या आगीनंतर तेथील आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या कोविड -१  पॉझिटिव्ह महिला रूग्णाला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसीएच) संदर्भित केले गेले. मात्र नागपूरला नेत असतानाच महिलेचा मृत्यू झाला. 

लाखांदूर तालुक्यातील  पेंढरी, सोनेगाव येथील अलका दिनेश रोहनकर ही दमा रुग्ण असल्याने उपचाराकरिता जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. आग लागल्यानंतर जवळपास ५० रुग्नाना रात्री ३ वाजता खाजगी व नागपूर येथे हलविण्यात आले. यात अलका दिनेश रोहनकर यांना नागपूर येथे रुग्णवाहिकेने नेत असतानाच रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 
मृताचा नातेवाईक प्रभू बोरकुटे यांनी न्यूज कट्टा सोबत बोलताना सांगितले की, “ अलका दिनेश रोहनकर यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविडच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आग लागल्यानंतर रुग्णालयात गोंधळ उडाला. माझे नातेवाईक आणि आणखी एक रूग्ण एका रूग्णवाहिकेत जीएमसीएच नागपुरात दाखल झाले. मी सुद्धा त्यांच्याबरोबर दुसर्‍या वाहनात गेलो. जीएमसीएच नागपुरात तिला मृत घोषित करण्यात आले. ”

बोरकुटे म्हणाले की, "जीएमसीएच नागपुरातील डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की ती कोविड पेशंट असल्याने मृतदेह देण्याची हमी नाही." डॉक्टरांनी सांगितले की कोविड रूग्णाच्या निकषांनुसार अंत्यसंस्कार नागपुरात केले जातील. “म्हणून आम्ही त्याच रुग्णवाहिकेच्या चालकाला मृतदेह भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात परत नेण्याची विनंती केली. पण ड्रायव्हरने नकार दिला. त्यानंतर आम्ही खासगी वाहन बुक केले. आता आम्ही मृतदेह घेऊन भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात परत जात आहोत. ”
बोरकुटे म्हणाले की, आणखी एक रूग्णास नागपूरच्या जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले. जिल्हा सामान्य रुंग्नालायाच्या चुकीमुळे आम्ही आमचे नातलग गमावले आहे. बोरकुटे यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links