BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

13738 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

भंडारा येथे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडवीण्याचा प्रयत्न विफल

भंडारा येथे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडवीण्याचा प्रयत्न विफल

सीबीएसई शाळांच्या विरोधात शिक्षा बचाव समितीची निदर्शने

प्रविण उदापूरे यांना पोलिसांनी सकाळीच केले स्थानबद्ध

 

न्यूज कट्टा / भंडारा 

मुख्यमंत्र्यांच्या भंडारा भेटी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा परिषद इमारतीसमोर शिक्षा बचाव समिति आंदोलनकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडविण्याचा प्रयत्न पोलिसांच्या तत्परतेने विफल ठरला.

आज भंडारा येथे सामान्य रुग्णालय अग्निकांड प्रकरणात भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आलेले असतांना 24 दिवसांपासून सीबीएसई शाळा विरोधात बसलेल्या आंदोलनकर्त्यांनी प्रचंड घोषणा देत ताफा अडविण्याचा असफल प्रयत्न केला. तत्पूर्वी नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य व आंदोलनाचे सह संयोजक प्रवीण उदापूरे यांना सकाळीच आंदोलन स्थळी प्रचंड पोलिस बंदोबस्तात पोलिस मुख्यालयी स्थानबद्ध करण्यात आले होते.

उदापुरे यांना स्थानबद्ध केले असले तरीही त्यांच्या मोबाइल वरुन ते पालकांच्या संपर्कात होते. वृत्त कळताच अनेक पालक जिल्हापरीषद समोरील आंदोलन स्थळी एकत्र आले. जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांच्या आदेशावरून ऐन वेळी पोलिसांनी आंदोलन स्थळी पोहोचून स्थिति आटोक्यात आणली.

मुख्यमंत्र्यांचा ताफा समोर येताच पालक आणि विद्यार्थ्यांनी घोषणा बाजी करून ध्यानकर्षण केले. जिल्ह्यातील बोगस आढ़ळलेल्या शाळांवर प्रशासकाची नियुक्ती करावी. संचालकांवर कार्यवाही करुन वसुल केलेली ज्यादा फीस पालकांना व्याजासह परत करुन शाळेत मान्यताप्राप्त शिक्षक व मुख्याध्यापकाची नियुक्ती करण्याच्या मागणी शिक्षा बचाव समितीने केली आहे.

आंदोलनात शिक्षा बचाओ आंदोलन समितीचे संयोजक नितीन निनावे, प्रहार जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी, जय डोंगरे, अजय रेहपाडे, ओमप्रकाश चकोले, भाऊ कातोरे, ऐडवोकेट वैद्य, प्रध्न्या नंदेश्वर, प्रीती बडोले, निता सेलोकर, स्नेहल निर्वाण, संजय चौधरी, राजेश देशकर, किशोर आगलावे, हेमंत बडवाईक, योगेश कुथे, सचिन निंबार्ते, संतोष हटवार, हेमंत लोंदासे, पंकज साकुरे, पप्पू भेलावे, पालक व विद्यार्थी उपस्थीत होते.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links