BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

6747 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

भंडारा अग्निकांडाची पोलिसांत तक्रार

भंडारा अग्निकांडाची पोलिसांत तक्रार

 

न्यूज कट्टा / भंडारा

जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे लागलेल्या आगीत १० निष्पाप नवजात बालकांचा आगीत जळून व गुदमरुन मृत्यु झाला. रुग्णालयातील या घटनेची भंडारा शहर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात अति दक्षता कक्षाच्या परिचारिका ज्योती शेखर भरसकरे यांनी सहायक शल्य चिकित्सक डॉ. सुनीता बढे यांच्यातर्फे शनिवारी सकाळी भंडारा शहर पोलिस ठाण्यात येऊन ही तक्रार केली अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

शनिवारी पहाटे दीड वाजता दरम्यान नवजात अति दक्षता कक्षात आग लागून धूर निघाला. या घटनेत कक्षात भरती असलेल्या 17 पैकी 'आउट बॉर्न' भागात असलेल्या 10 बालकांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख या तक्रारीत आहे. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी काटे करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links