BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

166 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा 

बाळंतीन महिलाचे  शारीरिक आणि मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्याला प्राधान्य - यशोमती ठाकूर 

बाळंतीन महिलाचे  शारीरिक आणि मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्याला प्राधान्य - यशोमती ठाकूर 
 

न्यूज कट्टा / भंडारा 


ज्या दहा मातांनी या दुर्दैवी घटनेत त्यांच्या काळजाचा तुकडा गमावला आहे त्या मातांची मनस्थिती या वेळी अत्यंत वाईट आहे. त्यामुळे या क्षणाला या १० बाळंतीन महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य अबाधित ठेवणे हा माझा प्राधान्यक्रम आहे, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट दिली असता प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. 

नऊ महिने गर्भात जपलेल्या बाळाला गमाविल्याचे दुख काय आहे हे मी समजू शकते. मी मंत्री नंतर आधी मी एक महिला एक आई आहे. सध्या या १० बाळंतीन महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे माझे काम आहे. १० बाळंतीनीना कुठल्याही प्रकारे शारीरिक हानी होवू नये याचे आम्ही नियोजन करीत आहोत. यासाठी मानसोपचार तज्ञ त्यांचे समोपाचार करणार आहेत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी, अंगणवाडी व आरोग्य सेविका यांच्या मार्फत वेळोवेळी आढावा घेवून या दहा मतांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल असेही यशोमती ठाकूर यांनी सांगितले. 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links