BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

86 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


नवी दिल्ली

भंडारा अग्निकांड पीडितांना प्रधानमंत्री कार्यालयातर्फे 2 लाख रुपयांची मदत जाहीर 

भंडारा अग्निकांड पीडितांना प्रधानमंत्री निधीतून 2 लाख रुपयांची मदत 

राज्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांचे मानले आभार 

 

न्यूज कट्टा ब्यूरो 

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय दुर्घटनाप्रकरणी पीडित कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. तर या घटनेत जे गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांना ५०,००० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ही मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटे २च्या सुमारास आग लागल्याने १० चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. तेथील १७ नवजात बालकांपैकी सात बालकांना वाचवण्यात यश आले. मृत बालके एक ते तीन महिने वयाची होती. त्यांत आठ मुली आणि दोन मुले होती. 

प्रधानमंत्री कार्यालयाच्या ट्वीटला उत्तर देत महाराष्ट्र राज्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले. 'भंडारा येथील अग्निकांड पीडित परिवारांना योग्य वेळी मदत केल्याबद्दल नरेंद्र मोदीजींचे आभार' असे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.    

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच मृत बालकांच्या पालकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. 

 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links