BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

154 Views

By नदीम खान


भंडारा

बांधकाम मंत्रालयातर्फे राज्यातील सर्व रुग्णालयांचे ऑडिट करू : मंत्री एकनाथ शिंदे

बांधकाम मंत्रालयातर्फे राज्यातील सर्व रुग्णालयांचे ऑडिट करू : मंत्री एकनाथ शिंदे

भंडारा सामान्य रुग्णालयाची केली पाहणी

 

न्यूज कट्टा / नदीम खान 

सार्वजनिक बांधकाम मंत्रालयातर्फे राज्यातील सर्व रुग्णालयांचे व विशेषतः अति दक्षता कक्षांचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करू आणि अशी घटना पुनः होणार नाही याची दक्षता घेऊ असे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भंडारा येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

भंडारा सामान्य रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे एक्सटेन्शन बंधकाम 2014 वर्षी पूर्ण होऊन या इमारतीचे उद्घाटन 14 ऑगस्ट 2015 ला करण्यात आले होते. याच एक्सटेन्शन भागात नवजात अति दक्षता कक्ष स्थापन करण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार नवजात अति दक्षता कक्ष विकसनाची निविदा औरंगाबाद येथील शर्मा कंसलटंट यांना मिळाली होती. "त्याच वेळेला जर फायर सेफ्टी आणि एक्जिट प्लान केला असता तर भंडारा जिल्हा रुग्णालयात दुर्घटना घडली नसती," असे शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम सामान्य रुग्णालय भंडारा यांनी सांगितले. 

भंडारा सामान्य रुग्णालयाची केली पाहणी

नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्याकडून  घडलेल्या घटनेसंदर्भात विस्तृत माहिती घेतली. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, माजी खासदार मधुकर कुकडे आदी उपस्थित होते.

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुणालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीमुळे दहा बालकांचा मृत्यु झाला तसेच सात बालकांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्त आयसीयु कक्षाला तसेच वाचलेल्या बालकांच्या कक्षाला भेट दिली.

या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून या समितीचा अहवाल तातडीने प्राप्त होणार आहे, असे श्री. शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. घटना अत्यंत दुर्दैवी असून यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

लेटेस्ट न्यूज

About Us



'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links