जिल्ह्यात 16 ला कोवीडचे लसीकरण
100 लाभार्थ्यांची घेतली रंगित तालीम
न्यूज कट्टा / भंडारा
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 16 जानेवारी 2021 पासून जिल्हयामध्ये कोवीड 19 लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी संदिप कदम व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांच्या मार्गदर्शनाखाली कोवीड 19 लसीकरण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय साकोली, उपजिल्हा रुग्णालय तुमसर, ग्रामिण रुग्णालय लाखनी व ग्रामिण रुग्णालय पवनी येथे राबविण्यात येणार आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी येथे 13 जानेवारी 2021 रोजी "ड्राय रन" राबविण्यात आले होते. सदर प्रक्रिया जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तुमसर-साकोली, ग्रामिण रुग्णालय पवनी, सिहोरा, अडयाळ, लाखनी, पालांदूर, लाखांदूर, मोहाडी इ. सर्व जिल्हा, उपजिल्हा व ग्रामिण रुग्णालय येथे राबविण्यात आली.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार व्हॅक्सीनेशन ऑफिसर 1 म्हणून पोलिस कर्मचारी असणार आहेत. त्यामध्ये 3 रुममध्ये लसीकरणासाठी व्यवस्था करण्यात आली होती, पहिल्या रुम मध्ये नोंदणी, दुसऱ्या रुममध्ये लसीकरण व तिसऱ्या रुममध्ये लसीकरणानंतर 30 मिनेटे बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक केंदात 10 याप्रमाणे एकुण 100 लाभार्थ्यांवर कोवीड 19 च्या लसीकरणासाठी ड्राय रन म्हणजे लसीकरणासाठी रंगीत तालीम राबविण्यात आली या ड्राय रन मध्ये लस न देता लसीकरणासाठी संपूर्ण प्रक्रिया राबविली गेली.
जिल्ह्यात 16 जानेवारी रोजी शनिवारला कोवीड 19 चे लसीकरण करून घेऊ या कारण 'आपण सुरक्षित तर देश सुरक्षित" तरी कोवीड 19 चे लसीकरणसाठी, भंडारा जिल्हा आरोग्य यंत्रणा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज झाली आहे.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'