BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

85 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

भंडारा अग्निकांडाची चौकशी करणाऱ्या समितीला रवीवारपर्यंत मुदतवाढ

भंडारा अग्निकांडाची चौकशी करणाऱ्या समितीला रवीवारपर्यंत मुदतवाढ

 

न्यूज कट्टा / भंडारा
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटमधील आग प्रकरणी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती सखोल चौकशी करीत असून या समितीला चौकशीसाठी आणखी थोडा कालावधी लागणार आहे. ही समिती आता येत्या रविवारी आपला अहवाल सादर करेल अशी माहिती आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.

आगीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकारी यांना व्हीसीद्वारे सुरक्षा विषयक ऑडिट तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच स्थानिक अग्निशमन यंत्रणा व संबंधित विद्युत विभाग यांनी देखील आपल्या क्षेत्रातील शासकीय रुग्णालयांना नियमितपणे भेटी देऊन वीज व अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित आहे का याची तपासणी करीत जावी अशी सूचना जिल्हा प्रशासनाला  केल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्निकांडाची चौकशी करण्यासाठी शासनाने सहा सदस्यीय समिति गठित केली आहे. समितीने तीन दिवसांत आपला अहवाल सादर करावा असे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घटनेच्या दिवशीच दिले होते. तसेच प्रारंभीक अहवाल तात्काळ सादर करावे अश्या सूचना त्यांनी केल्या होत्या.

या समितीच्या अध्यक्ष डॉ. साधना तायडे असून त्यांच्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरचे बालरोगतज्ञ, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, फायर सेफ्टी विभाग नागपूरचे अग्निसुरक्षा तज्ञ, आरोग्य सेवा नागपूर चे बायोमेडीकल इंजीनियर व जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांचे प्रतिनिधि आहेत. या घटनेशी संबंधित तांत्रिक बाबी तपासून घेण्याकरिता नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या थेट पर्यवेक्षणाखाली पी. एस. रहांगडाले, आपत्ति व्यवस्थापन व अग्नि सुरक्षा उपायुक्त, बृहन्मुंबई महानगर पालिका मुंबई यांची नियुक्ती केली आहे. रहांगडाले यांनी काल समितीसोबत चर्चा करून घटनेसंदर्भात आपले विचार मांडले आहेत. 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links