भंडारा अग्निकांड पीडितांना एकूण 10 लाखाची मदत
राजकीय पक्षातर्फे मदत जाहीर करणारा शिवसेना हा पहिला पक्ष
न्यूज कट्टा / भंडारा
गेल्या शनिवारी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुणालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यु झाला होता. तसेच सात बालकांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले.
घटनेत मृत पावलेल्या बालकांच्या परिवाराला मुख्यमंत्र्यांतर्फे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 5 लाखांचा सहाय्यता निधी 9 तारखेलाच घोषित केला होता. त्यानंतर 11 जानेवारीला प्रधानमंत्री कार्यालयातर्फे पीडितांच्या परिवाराला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाखाची मदत जाहीर झाली होती. तसेच आज 13 जानेवारीला राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी या घटनेत मृत पावलेल्या प्रत्येक बालकांच्या कुटुंबियांना स्वेच्छानिधीतून दोन लाख रुपये मदत देण्याचे घोषित केले. यानंतर राज्याचे नगरविकास व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतर्फे पीडित कुटुंबांना प्रत्येकी 1 लाख रुपयाची मदत देण्याची घोषणा केली. भंडारा अग्निकांडात कोणत्याही राजकीय पक्षाने पीडितांच्या कुटुंबांना पक्षातर्फे मदत जाहीर करण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे.
भाजपतर्फे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधीच पीडितांच्या परिवाराला राज्य सरकारने 10 लाख रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी केली होती.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'