BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

174 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

फिरते बाल वाचनालय या उपक्रमाची राज्यस्तरावर निवड

फिरते बाल वाचनालय या उपक्रमाची राज्यस्तरावर निवड

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी पाच शिक्षकांत पुरुषोत्तम झोडे यांचा प्रथम क्रमांक
 

न्यूज कट्टा / भंडारा 

पुरुषोत्तम झोडे पदवीधर शिक्षक जि.प.उच्च प्राथमिक शाळा मांगली, लाखनी यांच्या, ‘कोरोना काळात, फिरते बाल वाचनालय विद्यार्थ्यांच्या दारात’ या नवोपक्रमास राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड झालेल्या पाच मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. 

प्रत्यक्ष अध्यापन करताना शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण शिक्षणासाठी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग व नवनवीन कौशल्य उपक्रमशील शिक्षक राबवित असतात. त्यांच्या ज्ञानाचा सर्वांना फायदा व्हावा, त्यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन मिळावे यासाठी  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे महाराष्ट्रच्या वतीने नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. याअंतर्गत शिक्षकांकडून नवोपक्रमाचे चार ते पाच हजार शब्दात अहवाल लेखन करून घेतल्या जाते.
प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक या गटात प्रथम फेरीतून निवड झालेल्या व द्वितीय फेरीमध्ये पात्र ठरलेल्या नवोपक्रमशील स्पर्धक शिक्षकांचे द्वितीय फेरीतील मूल्यमापन आभासी मुलाखत घेऊन करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक पुरुषोत्तम झोडे पदवीधर शिक्षक जि.प.उच्च प्राथमिक शाळा मांगली, लाखनी यांच्या, ‘कोरोना काळात, फिरते बाल वाचनालय विद्यार्थ्यांच्या दारात’ या नवोपक्रमास, द्वितीय क्रमांक मंजुषा नंदेश्वर पद. शिक्षक महालगाव, तुमसर यांच्या ‘झटपट इंग्रजी वाचन कौशल्य विकसन’ या नवोपक्रमास,  तृतीय क्रमांक कु. मंगला बोपचे स.शि. शिवनी, लाखनी यांच्या ‘लॉकडाऊन काळात शिक्षिकांसाठी तंत्रस्नेही शिक्षण’ या नवोपक्रमास, चतुर्थ क्रमांक खुशाल डोंगरवार स. शि. पिंपळगाव, लाखांदूर यांच्या ‘उपक्रमातून पर्यावरण विकास’ या नवोपक्रमास, तर पाचवा क्रमांक बाळासाहेब मुंडे स.शि. माध्य. विद्यालय वरठी यांच्या ‘लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण पध्द्तीने ऑनलाइन शिक्षणातील सहभाग वाढविणे’ या नवोपक्रमास प्राप्त झाला. 
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता कल्पना बानकर, रहांगडाले अध्यापक विद्यालय सेंदुरवाफाचे प्राचार्य रामदास भुतेकर, प्रियदर्शिनी अध्यापक विद्यालय भंडाराच्या प्राचार्या आम्रपाली भिवगडे यांनी परीक्षण केले. यासाठी डॉ. रविंद्र जनबंधू यांनी सहकार्य केले.
शाळा बंद असल्या तरीही या स्पर्धेला जिल्हाभरातून शिक्षकांनी चांगला प्रतिसाद देऊन शाळा बंद पण शिक्षण सुरू असल्याचे दाखवून दिले. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी भंडारा जिल्ह्यातून उत्कृष्ट ठरलेल्या पहिल्या पाच शिक्षकांची निवड करून राज्यस्तरावर पाठविण्यात आले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता गुलाब राठोड यांनी राज्यात प्रतिनिधित्व करणा-या सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links