ग्रंथप्रदर्शनीने झाले मराठी भाषा पंधरवाडया चे उद्घाटन
न्यूज कट्टा / भंडारा
जे. एम. पटेल महाविद्यालयात मराठी विभाग, ग्रंथालय व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने "मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा" चे उद्घाटन शनिवार दिनांक 14 जानेवारी 2021 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या निमित्ताने आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्यांनी केले. ग्रंथप्रदर्शनात अनेक दुर्मिळ ग्रंथ, विश्वकोश, संस्कृती कोश व अभिनव साहित्यकृतीचा समावेश करण्यात आला होता. आपल्या उद्घाटनपर भाषणात प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी मराठी भाषेचा गौरव करताना म्हंटले की, "मराठी भाषा ही आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे, त्याचे वेगळेपण जोपासण्यासाठी मराठी ग्रंथ व साहित्याचे वाचन वाढावे म्हणून त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे."
याप्रसंगी महाविद्यालयातील 'अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे' समन्वयक डॉ. कार्तिक पनिक्कर यांनी आपल्या भाषणातून “भाषा व संस्कृती यांचा समन्वय प्रगाढ आहे. हा समन्वय टिकवायचा असेल तर भाषेचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन मराठी विभाग प्रमुख प्रा. सुमंत देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. उज्ज्वला वंजारी यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. ममता राऊत, डॉ. श्याम डफरे, डॉ. एस. डी. बोरकर, डॉ. निशा पडोळे, डॉ. अपर्णा यादव, प्रा. भोजराज श्रीरामे, डॉ. रोमी बिष्ट, डॉ. विजया कन्नाके, डॉ. पद्मावती राव, डॉ. विणा महाजन ग्रंथपाल मोना येवले, सहाय्यक ग्रंथपाल श्री. किरण डोळस यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाला प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
ऑनलाईन निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धा
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रस्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धा "मराठी भाषा संवर्धन: काळाची गरज" या विषयावर आयोजित केलेली आहे. विजेत्या स्पर्धकांसाठी प्रथम पारितोषिक रोख रु.3000, द्वितीय पारितोषिक रोख रु. 2000, तृतीय पारितोषिक रोख रु.1000 ठेवण्यात आलेले आहे. त्याच बरोबर "मराठी भाषा व्यवहार व साहित्य" या विषयावर प्रश्नमंजुषा चे आयोजन दिनांक 25 जानेवारी ते 28 जानेवारी 2021 या दरम्यान ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. प्रश्नमंजुषेत सहभागींना आकर्षक प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'