BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1769486 Views

By नदीम खान


भंडारा

भंडारा अग्निकांड: 7 पैकी 4 बालकांना ‘डिस्चार्ज’; 3 अजूनही रुग्णालयातच 

भंडारा अग्निकांड: 7 पैकी 4 बालकांना ‘डिस्चार्ज’; 3 अजूनही रुग्णालयातच 
 

न्यूज कट्टा / नदीम खान 


जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील नवजात शिशू अति दक्षता कक्षाला आग लागून 10 निष्पाप बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेतून वाचलेल्या 7 बालकांपैकी 4 बालकांना तब्बल एक आठवडया नंतर ‘डिस्चार्ज’ मिळाला असून ते सुखरूप आपापल्या मातांच्या कुशीत पोहोचले असले तरीही उर्वरित 3 बालकांना अजूनही सुट्टी न मिळाल्याने संशयाचे वातावरण आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात अति दक्षता कक्षात घडलेल्या भीषण अग्निकांडातून सुखरूप बाचावलेल्या सातही बाळांना रुग्णालयातील कुटुंब कल्याण विभागात तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या नवजात अति दक्षता कक्षात येथे ठेवण्यात आले होते. दि. 10 जानेवारी, रविवार रोजी सात बाळांमधून एकाच्या हातावर त्वचेशी संबंधित रोग असल्याची समस्या उद्भवली होती. स्थानिक त्वचारोग तज्ञ यांना त्याच्यावर उपाय होत नसल्याने बाळाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इस्पितळाच्या ‘डरमेटओलॉजी’ विभागात संदर्भित केले होते व सोमवारला ते बाळ सुखरूप परत आले.

इतक्या मोठ्या घटनेतून बचावल्यानंतर उर्वरित 7 बाळांचे पालक आपल्या बाळांना तात्पुरत्या नवजात शिशु दक्षता कक्षात ठेवायला तयार नव्हते पण राज्यातील बडे नेते येणार म्हणून या बालकांना रुग्णालय प्रशासनाने सुट्टी दिली नव्हती. एकूण 7 पैकी 2 बालकांना गुरुवारला व 2 बालकांना नुकतेच डिस्चार्ज देण्यात आले. ज्यांना डिस्चार्ज देण्यात आले त्यापैकी एक माता पालक दीक्षा दिनेश खंडाते यांच्या 17 दिवसाच्या जुडया मुली होत्या. मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी गावचे रहिवासी खंडाते कुटुंब 22 डिसेंबर पासून रुग्णालयातच आहे. त्यांच्या एका बाळाला रुग्णालय प्रशासनाने सुट्टी दिली पण दुसरीला थांबवून ठेवल्याने त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. या दोनपैकी एका बाळाला फुफ्फुसाचा त्रास असून दुसरीचे वजन कमी आहे. “रुग्णालयातील डॉक्टर आम्हाला वेठीस धरून आहेत. आम्हाला आमचे बाळ द्या व घरी जाऊ द्या,” असे खंडाते दाम्पत्य म्हणाले.

नवजात अति दक्षता कक्षात ठेवण्यात आलेल्या इतर 5 बालकांमध्ये महालगाव रहिवासी श्यामकला भुपेश शेंडे यांची 31 डिसेंबरला दाखल झालेली 9 दिवसीय (घटनेच्या दिवशी) मुलगी, तुमसर तालुक्यातील पिटेसुर रहिवासी अंजना युवराज भोंडे यांची 19 डिसेंबरला दाखल झालेली 20 दीवसीय मुलगी, मोहाडी तालुक्यातील वरठी रहिवासी चेतना उमेशकुमार चाचेरे यांची 7 जानेवारीला दाखल झालेली 2 दिवसीय मुलगी, भंडारा तालुक्यातील दिघोरी रहिवासी करिश्मा कन्हैया मेश्राम यांची 4 जानेवारीला दाखल झालेली 4 दिवसीय मुलगी, भंडारा तालुक्यातील कोका रहिवासी सोनू मनोज मारबते यांची 29 ऑक्टोबरला दाखल झालेली 72 दिवसीय मुलगी यांचा समावेश आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links