BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

445 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

नवीन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा

नवीन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा
नियमित विद्यार्थ्यांना जुन्या विषय योजनेनुसार परीक्षा देण्याची शेवटची संधि

न्यूज कट्टा / भंडारा 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 11 वी व 12 वी साठी 2020 पासून नवीन अभ्यासक्रम अमलात आणला. त्यानुसार विषय योजनेत सुधार करून विषयांना ग्रुप ए, बी, सी अशी विभागणी करून विद्यार्थ्यांनी बोर्डाचे आवेदन पत्र भरताना ग्रुप ए मधून  4, बी मधून  3 किंवा  1 व सी मधून 1 किंवा 3 विषय निवड करायचे आहे. एकूण आठ विषयांपैकी ग्रुप ए च्या 2 श्रेणी विषयांचा समावेश आहे. 

सुधारित विषय योजनेनुसार एबीसी ग्रुपमध्ये केलेल्या विभागणीमुळे पूर्वी वैकल्पिक विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांना 12 वी बोर्डाच्या परिक्षेत विषय निवडीबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. हे विद्यार्थी ज्या विषयात तयारी केलेली आहे त्या विषयाच्या परीक्षेपासून वंचित झाले असते. महासंघ व विज्युक्टाने याबाबत केलेल्या मागणी व पाठपुराव्याने संबंधित विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने आज 18 जानेवारी रोजी शासन आदेश निर्गमित करून अश्या विद्यार्थ्यांना शेवटची संधि दिली आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 8 ऑगस्ट, 2019 च्या शासन निर्णयानुसार 2020-21 पासून इयत्ता 12 वी साठी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना अमलात आणली आहे. या योजनेनुसार काही विषय कनिष्ठ महाविद्यालय परीक्षेसाठी बंद करण्यात आलेले आहेत. यात अवेस्ता-पहलवी, सामान्यज्ञान, हिन्दी उपयोजित, मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, स्टेनोग्राफी या विषयांचा समावेश असल्याने या विषयांचे महाविद्यालय स्तरावर अध्यापन बंद करणे अपेक्षित होते. पण काही कनिष्ठ महाविद्यालयांनी बदलांची दखल न घेता जुन्या पद्धतीनुसार अध्यापन अद्यापही सुरु ठेवलेले आहे. अश्या विद्यार्थ्यांना आता 12 वी बोर्ड परीक्षेची आवेदनपत्रे भरताना विषय निवडीमध्ये अडचणी येत आहेत, त्यामुळे 12 वी परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे भरणे शक्य होत नाही.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता अश्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावु नये यासाठी सन 2021 च्या परीक्षेसाठी मंडळाने दिलासा दिला आहे. 2021 ला 12 वि परीक्षेची आवेदन करणारे विद्यार्थी आता हे जुने विषय घेऊन परीक्षेला बसू शकतात. पण पुढील वर्षी म्हणजेच 12 वी च्या 2022 वर्षीच्या परीक्षेसाठी अशी सवलत देण्यात येणार नाही असे आजच्या शासन निर्णयात नमूद केले आहे. 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links