BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

3768 Views

By कविता मोरे/ नागापूरे


भंडारा

विद्यार्थी आधार नोंदणीमध्ये राज्यात भंडारा जिल्हा अव्वल

विद्यार्थी आधार नोंदणीमध्ये राज्यात भंडारा जिल्हा अव्वल
राज्यात  69. 94 टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी 
 

न्यूज कट्टा / कविता मोरे नागापुरे 
 

शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड स्टुडंट पोर्टलवर अपडेट करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरणामध्ये भंडारा जिल्हा राज्यात अव्वल असून 95.02 टक्के विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 

बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण्याचे काम पूर्ण करून विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक सरल प्रणाली मध्ये नोंदवून त्याची खात्री करून घ्यावी असे आदेश शिक्षण खात्याने आहेत. आधार नोंदणी करिता 31 जानेवारी ही अंतिम मुदत असून आतापर्यंत राज्यातील 69. 94 टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण केली आहे.

 महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये दोन कोटी 23 लाख 6 हजार 39 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 1 कोटी 56 लाख 82 हजार 215 विद्यार्थ्यांनी नोंदणी व अद्ययावतीकरण केले आहे. तर 67 लाख 21 हजार 824 विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झालेली नाही. 
राज्यात आधार नोंदणीमध्ये भंडारा जिल्हा अव्वल असून 95.02 दोन टक्के विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे तर गोंदिया जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून 91.4 टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. तर तिसरा क्रमांक वर्धा जिल्ह्याचा असून जिल्ह्यात 89.80 टक्के विद्यार्थ्यांनी आधार नोंदणी केली आहे. औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याची नोंदणी 50 टक्क्यांच्या मात्र खालीच झाली आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links