BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

270 Views

By कविता मोरे/ नागापूरे


भंडारा 

तब्बल तेरा वर्षांनंतर वेडसर महिलेची घरच्यांशी भेट,   महिला व बाल विकास सखी वन स्टॉप सेंटरचा पुढाकार 

तब्बल तेरा वर्षांनंतर वेडसर महिलेची घरच्यांशी भेट 


महिला व बाल विकास अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटरचा पुढाकार 

न्यूज कट्टा / कविता मोरे नागापूरे 

वेडसरपणाच्या भरात घरून निघून गेलेल्या महिलेची तिच्या कुटुंबियांशी तब्बल तेरा वर्षानंतर भेट घडून आली.  भंडारा जिल्ह्यातील महिला व बाल विकास अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटरच्या पुढाकाराने या महिलेला तिच्या मुलीला भेटता आले. 

मागील काही वर्षांपासून भंडारा शहरातील दुर्गा माता मंदिर, मोठा बाजार परिसरात एक 55वर्षीय वेडसर महिला घर करून राहात होती.  परिसरातील नागरिकांना ती कधी शिवीगाळ करायची त्यामुळे नागरिकही तिला त्रास द्यायचे. अनेकदा रात्रीच्या वेळी काही मद्यपी  तिची छेड काढत असत. परिसरातील काही दक्ष नागरिकांनी व  व्यापाऱ्यांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासनात यांना या बाबत  माहिती दिली.

 प्राप्त माहितीनुसार, केंद्र प्रशासक मोहुर्ले यांच्या मार्गदर्शनात सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी व मोहुर्लेने यांनी स्वतः या महिलेची भेट घेतली. तिची आपुलकीने विचारपूस केली आणि तिला सेंटरला दाखल करण्यासाठी आणण्यात आले. एक दिवस सेंटरला दाखल राहिल्यानंतर ही महिला परत दुर्गा माता मंदिर परिसरात निघून गेली. तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करीत सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी या वेडसर महिलेला परत भेटून तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल केले. मात्र रुग्णालयातूनही ती परत त्याच ठिकाणी गेली.

या वेडसर महिलेजवळ उपलब्ध असलेल्या आधार कार्डवरून सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या  कुटुंबाची माहिती काढली. पण फारसा फायदा झाला नाही. सखी वन स्टॉप सेंटरच्या समुपदेशिका वैशाली वाघाडे व पिरा मेडिकल नर्स अश्विनी मडामे यांनी अखेर भंडारा पोलीस स्टेशनला गाठले. पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी साठवणे यांच्या मदतीने वेडसर महिलेच्या कुटुंबियांची माहिती काढून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना भंडाऱ्याला बोलवण्यात आले.

या महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, ही महिला फुलमोगरा येथील रहिवासी आहे. 13 वर्षांपूर्वी ती घरून निघून गेली व त्यानंतर ती  घरी परतलीच नाही व घरच्यांनाही तिच्याबद्दल काही माहिती नव्हते. महिलेच्या मुलाच्या मदतीने सेंटरच्या कर्मचार्यांनी  तिला परत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मानसिक रोग तज्ञ डॉक्टर हरले यांच्या सल्ल्यानुसार सदर महिलेला मनोरुग्णालय नागपूर येथे पुढील उपचाराकरिता रेफर करण्यात आले आहे. 

१३ वर्षांपासून आपल्या माणसांपासून दूर असलेल्या माउलीला तिच्या कुटुंबियाना भेट करून देण्यासाठी  केंद्र प्रशासक मनिषा मोहुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी केलेली धडपड खरोखरच अभिनंदनास्पद आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links