BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

2703 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


पुणे

कोरोना लस तयार करणाऱ्या सीरम संस्थेत भीषण आग, कोरोना लस सुरक्षित!

कोरोना लस तयार करणाऱ्या सीरम संस्थेत भीषण आग, कोरोना लस सुरक्षित!
न्यूज कट्टा / पुणे 
 

कोरोना लस तयार करणाऱ्या पुण्याच्या सीरम संस्थेत गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास भीषण आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीनंतर अग्निशमन विभागाला त्वरित कळविण्यात आले. अग्निशमन यंत्रणा युद्धपातळीवर कार्य करीत आहे. कोरोना लसीचे कोणतेही नुकसान झाले नाही असे सांगण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  पुण्यातील मांजरी येथे स्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या नवीन प्लांटमध्ये ही आग लागली. गेल्या वर्षीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी या प्लांटचे उद्घाटन केले होते. मात्र अद्याप या प्लांट मध्ये कोविड लस तयार करण्यास सुरवात झालेली नव्हती. 

गुरुवारी दुपारी ही भीषण आग लागली.  बीसीजी लस तयार करण्यात येत असलेल्या इमारतीला आग लागली आहे. सीरम संस्थेच्या या भागात एक नवीन प्लांट आहे. पुण्यातील सीरम संस्थेच्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर आग लागली आहे. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सीरम संस्थेने कोरोना लस तयार केली आहे.

अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार दुपारी अडीचच्या सुमारास सीरम इन्स्टिट्यूटमधून आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन विभागाची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. १५ अग्आनिशामक दलाच्या गाड्या आग  विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. आगीचे कारण किंवा आगीत झालेल्या नुकसानीचे कारण कळू शकले नाही. या सर्व गोष्टींची चौकशी नंतर केली जाईल. सध्या आग विझविणे हे प्रथम प्राधान्य आहे.

कोविडशील्डला कोणताही धोका नाही- अदार पूनावाला 
ज्या ठिकाणी कोरोना लस तयार केली जाते. ते ठिकाण पूर्णपणे सुरक्षित आहे. या जागेच्या दुसर्‍या बाजूच्या गेटला आग लागली आहे. ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे कोरोना लस होण्याचा धोका नाही. कोविड शिल्ड गेट क्रमांक 3, 4 आणि 5 च्या आवारात सुरक्षित आहे.

एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली
मिळालेल्या माहितीनुसार, आगीतून 3 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. आग विझविण्यासाठी एनडीआरएफची मदतही घेतली जात आहे. एनडीआरएफची एक तुकडी घटनास्थळी पोहोचली आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links