BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

4645 Views

By नदीम खान


भंडारा

भंडारा अग्निकांडात 5 डॉक्टर्स सह 2 परिचारिका दोषी | तीन निलंबित, तिघांची सेवा समाप्त, एकीची बदली

भंडारा अग्निकांडात 5 डॉक्टर्स सह 2 परिचारिका दोषी

तीन निलंबित, तिघांची सेवा समाप्त, एकीची बदली

 

न्यूज कट्टा / नदीम खान

भंडारा अग्निकांडाची चौकशी करणाऱ्या समितीने अहवाल सादर केल्या नंतर शासनाने आज भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील 7 लोकांवर ठपका ठेवत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांना निलंबित केले असून इतर 6 लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी आज दि. 21 ला बोलताना दिली.

निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, इन चार्ज वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना मेश्राम, इन चार्ज परिचारिका ज्योति बारस्कर यांचा समावेश असून बाल रोग तज्ञ डॉ. सुनील अंबादे, परिचारिका स्मिता आंबीलढुके व शुभांगी साठवणे यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. सुनीता बडे यांची बदली करण्यात आली आहे.

9 जानेवारीला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अति दक्षता कक्षाला आग लागून 10 निष्पाप जीवांचा बळी गेला. या अग्निकांडाची उच्च स्तरीय चौकशी 3 दिवसांत पूर्ण करून दोषींवर कारवाई करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भंडारा भेटीदरम्यान दिले होते. चौकशी समितीची सूत्रे आरोग्य विभाग संचालक डॉ. साधना तायडे यांच्या हाती दिल्या कारणावरून गदारोळ झाल्यानंतर आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या पर्यवेक्षणात समिति कार्य करेल असे आदेश काढले होते.

टोपे म्हणाले, “9 तारखेला मध्यरात्री 1 ते 2 च्या दरम्यान भंडारा जिल्हा रुग्णालयात जी दुर्दैवी घटना घडली त्याच्या बाबतीत नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीने सोमवार दि. 20 ला रात्री उशिरा आपला अहवाल सादर केला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आम्ही या निष्कर्षावर आलो की रेडिअन्ट वार्मर (इनक्यूबेटर) च्या कंट्रोल पॅनल मध्ये स्पार्क होऊन लागलेल्या आगीत ही घटना घडली. रेडिअन्ट वार्मर मध्ये गाद्या, प्लॅस्टिक चे साहित्य व इतर ज्वलनशील मटेरियल अधिक असल्याने आग वाढून धूर निर्माण झाला. जो स्पार्क झाला त्यासाठी वोल्टेज कमी जास्त होणे, डायोड किंवा इतर कारण असू शकतात.”

 

सार्वजनिक बांधकाम विभागसुद्धा दोषी

नवजात शिशु अति दक्षता कक्षाची इमारत 2015 मध्ये 2 कोटी निधी अनुदानाने सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारतीत अति दक्षता कक्ष सुरू करण्याआधी फायर सेफ्टीच्या सर्व गोष्टी तपासून घेण्याची आवश्यकता होती. ते काम 2015 मध्ये घाईगडबडीत झाले होते,” अशी विस्तृत माहिती आरोग्य मंत्री यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

 

काय आहे फॉरेन्सिक रिपोर्ट

फॉरेन्सिक रिपोर्ट नुसार आउट बोर्न यूनिट मधील 3 बालक आगीने होरपळून तर 7 बालक धुराच्या त्रासाने गुदमरून मृत पावले.

 

बायोमेडीकल इंजिनियर्स ची उपस्थिती अनिवार्य 

सर्व शासकीय रुग्णालयात बायोमेडीकल इंजिनियर्स ची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. नवजात अति दक्षता विभागाची मेंटेनेंस ची जबाबदारी फेबर सिंदूरी मॅनेजमेंट सर्विसेस या पुण्यातील एजन्सी कडे देण्यात आलेली होती. या कंपनीला आम्ही ताकीद दिली आहे. 

 

कोण कोण टर्मिनेट ? कोण सस्पेंड ?

टर्मिनेट - बाल रोग तज्ञ डॉ. सुनील अंबादे, परिचारिका स्मिता आंबीलढुके व शुभांगी साठवणे

सस्पेंड - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, इन चार्ज वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना मेश्राम, इन चार्ज परिचारिका ज्योति बारस्कर

बदली - अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. सुनीता बडे

 

या विषयावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना बोलताना पहा 'न्यूज कट्टा' यूट्यूब चॅनल वर आणि subscribe करा https://youtu.be/ifw6YLJVw-A

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links