BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

317 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा 

भंडारा आगारात सुरक्षितता मोहीम कार्यक्रम

भंडारा आगारात सुरक्षितता मोहीम कार्यक्रम
 

न्यूज कट्टा / भंडारा 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भंडारा विभागाच्या वतीने 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान  सुरक्षितता मोहीम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन 18 जानेवारी रोजी भंडारा आगारात करण्यात आले.

या  कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भंडारा  विभाग नियंत्रक विनय गव्हाळे होते. तर एम आय टी कॉलेज शहापूरचे प्राध्यापक शैलेश नागापुरे  यांची विशेष उपस्थिती होती. त्याचप्रमाणे विभागीय वाहतूक अधिकारी च. ना. वडसकर ,विभागीय भांडार अधिकारी श्रीमती बोपचे,  सहाय्यक कार्यकारी अधीक्षक हुलके उपस्थित होते मान्यवरांनी चालक / वाहक व यांत्रिक तसेच आगारातील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितता मोहिमेबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक च.ना. वडसकर यांनी केले. संचालन सहायक वाहतूक अधीक्षक सारिका लीमाजे यांनी तर आभार प्रदर्शन आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links