मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात संपन्न
विद्याभारती महाविद्यालयाची रविना बनसोड निबंध स्पर्धेत प्रथम
न्यूज कट्टा ब्यूरो
स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ दिनांक 14 जानेवारी ते दिनांक 28 जानेवारी 2021 दरम्यान उत्साहात संपन्न झाला. या अनुषंगाने मराठी विभाग, ग्रंथालय व गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनी, राष्ट्रस्तरीय निबंध स्पर्धा व प्रश्नमंजुषा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करून ‘पंधरवडा’ कार्यक्रमाचा प्रारंभ केला. ‘मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’ या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेत राज्यभरातून सुमारे 125 निबंध सादर झाले. या निबंध स्पर्धेचा निकाल दिनांक 28 जानेवारी 2021 ला महाविद्यालयाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत अमरावतीच्या विद्याभारती महाविद्यालयाची विद्यार्थिनी रविना राजेश बनसोड हिचा प्रथम क्रमांक आला तिला प्रमाणपत्र व रुपये 3 हजार असे पारितोषिक प्राप्त झाले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक, प्रमाणपत्र व रुपये 2000 निर्मिती राजकुमार देवलसी, बिंझाणी महिला महाविद्यालय, नागपूर हिला तर तृतीय क्रमांकाची मानकरी कु. समीक्षा उत्तम भोगे जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा ठरली. तिला प्रमाणपत्र व रुपये 1000 असे पारितोषिक प्राप्त झाले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचा भाग म्हणून घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत राज्यभरातून सुमारे 700 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
समारोपीय कार्यक्रम दिनांक 28 जानेवारीला प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. प्राचार्यांनी शुभेच्छा देत विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. समारोपीय कार्यक्रमाला मराठी विभाग प्रमुख प्रा. सुमंत देशपांडे, निबंध स्पर्धा संयोजक डॉ. उज्वला वंजारी, प्रश्नमंजुषा स्पर्धा संयोजक प्रा. ममता राऊत, ग्रंथपाल कुमारी मोना येवले, सांस्कृतिक विभागाच्या प्रभारी डॉ. अपर्णा यादव, रासेयो कार्यक्रम अधिकारी भोजराज श्रीरामे, शारीरिक शिक्षण अधिकारी डॉ. रोमी बिस्ट प्रामुख्याने उपस्थित होते.
"मराठी भाषा संवर्धन पंधरवडा"कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनात गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पनिकर, डॉ. श्याम डफरे, डॉ. प्रदीप मेश्राम, डॉ. शलील बोरकर, डॉ.पद्मावती राव, प्रा. टी. आर. गभने व संजय मेश्राम यांचे सहकार्य लाभले.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'