BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

79 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

सिंचन प्रकल्प भुसंपादन तातडीने पुर्ण करा: जलसंपदा  मंत्री जयंत पाटील

सिंचन प्रकल्प भुसंपादन तातडीने पुर्ण करा: जलसंपदा  मंत्री जयंत पाटील

 

न्यूज कट्टा / भंडारा

गोसेखुर्द प्रकल्प हा पूर्व विदर्भातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून जास्तीत जास्त क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळावा व जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी. यासाठी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाबाबतची भुसंपादनाची कार्यवाही तातडीने पुर्ण करावी. असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीला खासदार सुनिल मेंढे, आमदार राजू कारेमोरे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अधिक्षक अभियंता राजेश सोनट्टके, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.के. मानवटकर, नाना पंचबुद्धे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गोसेखुर्द, बावनथडी, चांदपूर, बघेडा, सोरणा व जिल्ह्यातील इतर प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचन क्षमता याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली.       

सिंचन प्रकल्पाबाबत भूसंपादानाचे विविध प्रकरणे प्रलंबित असून ते तातडीने सोडविण्यासाठी जलसंपदा व महसूल विभागाच्यावतीने विशेष मोहिम राबवून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. विकास प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे. प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांचे पुनर्वसन चांगल्या पद्धतीने व्हावे असे निर्देश त्यांनी दिले. पाणी वाटपा संदर्भात समिती तयार करुन पाणी वाटप करावे असे त्यांनी  यावेळी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

About Us



'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links