BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

85 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


नागपूर

कॉपी करताना सापडल्यास फेरपरीक्षाच!; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कॉपी करताना सापडल्यास फेरपरीक्षाच!; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

  • फेरपरीक्षेचा मंडळाचा निर्णय कोर्टाने ठरवला योग्य
  • परीक्षार्थी विद्यार्थिनीचा दावा कोर्टाने केला अमान्य

 

न्यूज कट्टा / नागपूर

बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना सापडलेल्या एका विद्यार्थिनीला पुन्हा परीक्षा देण्याचे आदेश राज्य शिक्षण मंडळाने दिले होते. त्या आदेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे व राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.

वृषाली नितीन रघटाटे असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती पूलगाव येथील आर. के. कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. २६ फेब्रुवारी २०२० रोजी वृषाली ही बारावी रसायनशास्त्राचा विषयाचा पेपरमध्ये कॉपी करीत होती. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या भरारी पथकाने तिला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी मंडळाने तिचा पेपर परत घेतला होता. त्यानंतर तिला बारावीची फेरपरीक्षा देण्याचे आदेश दिले. त्या आदेशाविरुद्ध तिने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.

वृषालीने कोर्टात बाजू मांडताना मंडळाच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. भरारी पथक आले त्या दिवशी परीक्षा केंद्रातील इतर मुले भीतीने एकमेकांकडे चिटोरे फेकेत होते. एक चिटोरा तिच्या पायावर फेकण्यात आला असता तिने भीतीने तो उचलून खिडकीतून फेकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भरारी पथकाने तिला पकडले व तिचा पेपर हिसकावून घेतला. त्यानंतर आपल्याला म्हणणे मांडण्याची पुरेपूर संधी न देता आपला निकाल रोखून पुन्हा परीक्षा देण्याचे आदेश दिले गेले. हा आदेश अन्यायकारक असून तो रद्द करण्यात यावा व आपला निकाल जाहीर करण्याची विनंती तिच्यावतीने करण्यात आली होती. दरम्यान, सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने मंडळाचा निर्णय योग्य ठरवून तिची याचिका फेटाळली. मंडळातर्फे अॅड. ओंकार देशपांडे आणि याचिकाकर्त्यातर्फे अॅड. एन. एस. वाळूरकर यांनी बाजू मांडली.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links