BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

138 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

मीनल करनवाल यांनी घेतली कोव्हॅक्स लस 

मीनल करनवाल यांनी घेतली कोव्हॅक्स लस 

 

न्यूज कट्टा / भंडारा 

जिल्ह्यामध्ये कोव्हॅक्स लसीकरण जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे सुरू झालेले असून पोलीस विभागातील कर्मचारी दिपक पंढरी गायधने यांनी पहिला डोज घेतला. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी मिनल करनवाल यांनी सुध्दा कोविड लस घेतली.

15 फेब्रुवारी 2021 पासून जिल्ह्यामध्ये 28 दिवसानंतर दुसरे डोजला सुरूवात झालेली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन 8 हजार 79 लाभार्थ्यांना ज्यांचे पहिल्या डोज घेतल्यापासून 28 दिवस पूर्ण झालेले आहेत. त्यांनी शासकीय सुट्टी व रविवार सोडून पहिले लसीकरण झालेल्या ठिकाणाहून दुसरे डोज घेण्यासाठी आवाहन करीत आहे. जिल्ह्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय व टी. बी. रुग्णालय, भंडारा, उपजिल्हा रुग्णालय तुमसर व साकोली तसेच ग्रामीण रुग्णालय पवनी, लाखांदूर व मोहाडी येथे लसीकरण सुरू झालेले आहे. कोविड लसीकरणाला जिल्ह्यात 16 जानेवारी पासून सुरुवात झाली असून आतापर्यंत 8 हजार 557 लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात लस घेतलेल्या लाभार्थ्यांना दुसरा डोज देण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत कोविशिल्डचे 23 हजार 700 तर कोव्हॅक्स व्हॅक्सीनचे 7 हजार 100 डोजेस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत.

को-वीन ॲप वर नोंदणी झालेले लाभार्थी फ्रंट लाईन वर्कर (पोलीस विभाग, होमगार्ड, नगर परिषद, तलाठी, तहसिल आणि पंचायत समिती) तसेच ज्या लाभार्थ्यांचा कोविड व्हॅक्सीनचा पहिला डोज झालेला आहे. त्यांनी 28 दिवस पूर्ण झाल्यावर पहिला डोज घेतलेल्या ठिकाणी जाऊन दूसरा डोज घ्यावे. (नोंदणीकृत मोबाईलवर एस. एम. एस. नाही आला तरी सुध्दा) लसीकरण करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links