BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

9957 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

अत्यंत खळबळजनक.....  विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका चक्क हातठेले आणि रस्त्यावर 

अत्यंत खळबळजनक 
विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका चक्क हातठेले आणि रस्त्यावर 

न्यूज कट्टा / भंडारा, २४ फेब्रुवारी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ३५० च्या वर उत्तरपत्रिका चक्क भंडारा जिल्ह्यांमध्ये भज्यांच्या दुकानात ,पोत्यांमध्ये आणि रस्त्यावर सापडल्याचा खळबळजनक प्रकार  समोर आलेला आहे.  या उत्तरपत्रिका राष्ट्रीय महामार्गावर बेवारस पडलेल्या असताना फिरायला जाणाऱ्या काही सुजाण नागरिकांच्या हाती लागताच त्यांनी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रवीण उदापुरें याच्या सुपूर्त केल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. 

भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी पोत्यांमध्ये भरलेल्या अवस्थेत उत्तर पत्रिका सापडल्या. यातील काही उत्तरपत्रिका जुन्या आहेत. या सर्व उत्तर पत्रिका आज दि. २४ फेब्रुवारी रोजी भंडारा पोलीस स्टेशन येथे पंचनामा करण्याकरीता आणण्यात आल्या. यावेळी परीक्षा व मूल्यमापन नियंत्रक डॉक्टर प्रफुल्ल साबळे तसेच विद्यापीठाचे काही अधिकारी उपस्थित होते. या संदर्भात परीक्षा व मूल्यमापन  नियंत्रक डॉक्टर प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, विद्यापीठातर्फे ई-टेंडरिंगच्या माध्यमातून उत्तर पत्रिका सुहास ट्रेडिंग कंपनीला देण्यात आल्या होत्या. त्यांनी २० ट्रक उत्तरपत्रिका विद्यापीठातून उचलून त्यांच्या गोडाउनमध्ये जमा केल्या. त्या सर्व उत्तर पत्रिका एकत्रित करून रायपूर जवळील लोहिया पेपर मिल येथे पाठवल्या जात होत्या. दरम्यान १० फेब्रुवारी रोजी उत्तरपत्रिका घेवून जाणारया ट्रकचा रात्रीच्या सुमारास अपघात झाला. या अपघातांमध्ये ट्रकमधील उत्तरपत्रिकांचा एक बंडल खाली पडला, त्यावेळी खाली पडलेल्या उत्तरपत्रिका गोळा करण्यात आल्या मात्र काही गठ्ठे हाती लागले नाही असे त्यांनी सांगितले. 

 नियमानुसार खुल्या पद्धतीने ह्या पत्रिका नेता येत नाही त्यांना प्लास्टिकच्या बोरीमध्ये न्यावे लागते मात्र तरीसुद्धा अपघात घडल्यामुळे अशा पद्धतीने रस्त्यावर उत्तरपत्रिका पडलेल्या होत्या, त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. 

विद्यापीठात दरवर्षी उन्हाळी परीक्षेत ४ लाख ६० हजार तर हिवाळी परीक्षेत ३ लाखावर विद्यार्थी परीक्षेस बसतात. त्यामुळे हिवाळी परीक्षेत १८ लाख उत्तरपत्रिका तर २२ लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यात येते. त्यामुळे दोन परीक्षेत जवळपास चाळीस लाख उत्तरपत्रिका विद्यापीठाकडे जमा होतात. त्यामुळे या उत्तरपत्रिका दरवर्षी रद्दीत टाकून त्यांची विक्री केली जाते. ही रद्दी विकण्यासाठी विद्यापीठाकडून निविदा मागविल्या जातात. जो कंत्राटदार अधिकची रक्कम मोजेल, त्याला रद्दी विकल्या जाते. रद्दी विकताना कंत्राटदाराकडून आलेल्या ट्रकचे वजन केल्या जाते. त्यानंतर त्यात रद्दी भरून त्याचे वजन केल्या जाते. कंत्राटदाराकडून वित्त विभागाकडे पैसे भरल्यावरच ट्रक सोडल्या जातो. काल सकाळी सापडलेल्या उत्तरपत्रिका हिवाळी परीक्षा २०१७, उन्हाळी २०१८, हिवाळी २०१८, उन्हाळी २०१९ या वर्षाच्या उत्तरपत्रिकेचा समावेश आहे. यावर्षी शुक्रवारी, तेलीपुरा येथील सुभाष ट्रेडिंग कंपनी यांना कंत्राट देण्यात आले आहे. हे कंत्राटदार रद्दीला योग्य भाव मिळाल्यावर रायपूर येथील लोहिया पेपर मिल किंवा तुमसर येथील एरोल पेपर मिल यांच्याकडे देण्यात येते. नागपूर- रायपूर मार्ग भंडारा जिल्ह्यात रस्त्यावर उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडल्याचे आढळून आले. या उत्तरपत्रिका नागरिकांना एकत्र करीत सिनेट सदस्य प्रवीण उदापूरे यांच्याकडे आणून दिल्यात.

उत्तर पत्रिका जुनी असो किंवा नवीन त्यात विद्यार्थ्यांची मूल्यांकन करतात याची माहिती असते त्यामुळे ही बाब गोपनीय असते याची संपूर्ण जबाबदारी परीक्षा विभागावर असते. असे असताना या उत्तरपत्रिका बाहेर आल्या कशा ? निकाल लागले होते का? या उत्तर पत्रिकांचा भविष्यात गैर वापर झाल्यास जबाबदार कोण ? असे प्रश्न उपस्थित करीत सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी यामध्ये दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links