BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

3086 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


लाखांदूर

विदर्भ कोकण ग्रामिण बँकेत दरोडा .....  परसोडी/नाग शाखेतील घटना

विदर्भ कोकण ग्रामिण बँकेत दरोडा 

 परसोडी/नाग शाखेतील घटना

 न्यूज कट्टा /  लाखांदुर, ७ मार्च 

विदर्भ कोकण ग्रामिण बँक परसोडी/नाग शाखेत तीन अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला असून, बँकेत रोख रक्कम मिळाली नसल्याने दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. सदरची घटना रविवारला (ता.७) पहाटे ३ वाजता सुमारास घडली आहे.

लाखांदुर तालुक्यातील परसोडी/नाग येथील विदर्भ कोकण ग्रामिण बँकेचे सर्व कर्मचारी शनिवारला बँक बंद करून गेल्यानंतर मध्यरात्री १२ ते ३ वाजताच्या सुमारास तीन अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याच्या हेतूने बँकेची खिडकी तोडून थेट बँकेत प्रवेश केला होता. लाँकरसह सर्वञ शोधाशोध केली माञ बँकेत रोख रक्कम आढळून आली नसल्याने त्यांचा दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

दरम्यान बँकेत कार्यरत सिस्टमच्या माध्यमातून राञी सुमारास बँकेत काही जण घुसल्याचे संदेश बँकेच्या कर्मचाऱ्यांना गेले असता शिपाई पदावर कार्यरत भावेश हटवार यांना बँकेत जाऊन पाहण्यास सांगितलें होते. त्यानुसार भावेश हटवार यांनी सकाळी ८ वाजता सुमारास बँकेत जाऊन पाहिले असता, बँकेची खिडकी तुटलेल्या अवस्थेत दिसून आली. सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता, चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेले तिन अज्ञात चोरटे खिडकी तोडून घुसल्याचे दिसून आले आहे.

अज्ञात चोरट्यांना बँकेत रोख रक्कम मिळाली नसल्याने त्यांनी बँकेतील इंटरनेट कनेक्शनचे दहा हजार रुपये किंमतीचे साहित्य गहाळ केल्याचे दिसून आले आहे. सदर घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यांत आली असून, पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत..

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links