BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

59 Views

By NewsKatta


 मुंबई

विधानपरिषदेच्या ५ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी 

विधानपरिषदेच्या ५ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी 
न्यूज़ कट्टा /  मुंबई

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद, नागपूर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून आणि पुणे, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर  ५ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी विधानभवनात झाला. 

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी या पाच नवनिर्वाचित सदस्यांना  शपथ दिली. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सतीश चव्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस ), नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अभिजीत वंजारी (कॉंग्रेस ),  पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अरुण लाड (राष्ट्रवादी कॉंग्रेस ),  पुणे विभाग शिक्षक  मतदारसंघातून निवडून आलेले जयंत आसगावकर ( कॉंग्रेस ) आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले किरण सरनाईक (अपक्ष ) यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली. 
विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी प्पर पडला असून यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलिमा गोऱ्हे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध विभागाचे मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते.
 

लेटेस्ट न्यूज

About Us



'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links