BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

974 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

मालगाडीच्या धडकेत वाघ ठार 

मालगाडीच्या धडकेत वाघ ठार 

  • नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील घटना 
  • मृत वाघ टी-14 या वाघिणीचे शावक

 

न्यूज कट्टा 

भंडारा दि. 8: नवेगाव नागझिरा संरक्षित व्याघ्र क्षेत्राच्या जवळून जाणाऱ्या रेल्वेमार्गाने पुन्हा एकदा एका वाघाचा बळी घेतला. गोंदिया ते बल्हारशाह ब्रॉड गेज रेल्वे मार्गावर पिंडकेपार गावाजवळ सोमवार दि. 8 च्या पहाटेला 6 वाजताच्या सुमारास मालगाडीच्या धडकेत एका 18 महिन्याच्या वाघाच्या शावकाचा जागीच मृत्यू झाला. 

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील टी-14 या वाघिणीला 3 शावकांसोबत नवेगाव विभागात वावरताना परिसरातील अधिकाऱ्यांनी बघितले होते. त्या तीन शावकांपैकी एक या दुर्घटनेत दगावले असल्याची सूत्रांकडून माहिती आहे. टी-14 वाघिण आपल्या तीनही शावकांसोबत रेल्वे रूळ ओलंडत असताना दुर्दैवाने एक शावक बल्लारशाकडून गोंदियाकडे येणाऱ्या मालगाडीच्या डब्याखाली आल्याने उजवा पाय पूर्णपणे कापला गेला असल्याची माहिती आहे. 

घटनास्थळी गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, वन्यजीव विभागाचे अधिकारी एसिएफ सदगीर व इतर अधिकारी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links