BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

842 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

प्रेमीयुगुलाची वैनगंगेत जलसमाधी 

प्रेमीयुगुलाची वैनगंगेत जलसमाधी 

 

न्यूज कट्टा ब्यूरो 

भंडारा, दि. 12 : विधवा प्रेयसी आणि तिला असलेल्या दोन अपत्यांमुळे कुटुंबीय विवाहाला मान्यता देणार नाही. या निष्कर्षाप्रती पोहोचल्यानंतर तरुण प्रियकराने विधवा प्रेयसीसोबत नैराश्यातून वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज गुरूवारला उघडकीस आली.

नाशिक बावनकुळे (२९) व सोना (३३) (काल्पनिक नाव) असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमियुगुलाचे नाव आहे. हे दोघेही भंडारा शहरातील शुक्रवारी वार्डातील रहिवासी आहे. दोघांचीही घरे एकमेकांच्या शेजारी आहेत. सोना यांच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. सोनाला  १४ वर्षाचा मुलगा व ११ वर्षाची मुलगी आहे. सोना आणि नाशिक हे शेजारी राहत असल्याने दोघांमध्ये प्रेम जळले.

दोघांनी एकमेकांसोबत 'साथ जियेंगे साथ मरेंगे' च्या आणाभाका केल्या. सोना नाशिकपेक्षा वयाने मोठी असून ती विधवा आहे. तसेच तिला दोन अपत्य असल्याने कदाचित कुटुंबीयांनी दोघांच्या विवाहाला विरोध केला असावा. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. सोना घरून गायब असल्याची तक्रार तिच्या दिराने भंडारा पोलिसात दाखल केली होती. यावरून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली.

दरम्यान, वैनगंगा नदी तीरावरील निर्वाण घाटाजवळ सोनाची दुचाकी आढळून आली. यावरून पोलिसांनी शोध सुरू केला असता सकाळी ११ वाजताच्या सुमारास नदीत तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. 
तिथे जवळच पुरुषाच्या चप्पल व मोबाईल पोलिसांना सापडल्याने महिलेच्या प्रियकराची माहिती घेतली. नाशिक याच्या भावाला घटनास्थळावर बोलावून चप्पल व मोबाईल दाखवली असता त्याने ओळखली. त्यानंतर पोलिसांनी  श्वान पथकाला घटनास्थळावर बोलवले असता त्यानेही नदीकडे दिशा दर्शविली. बोटीच्या माध्यमातून नाशिकचा शोध घेतला असता दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्याबाहेर आला. दोघांच्याही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

याप्रकरणी भंडारा पोलिसांनी मर्ग दाखल केला असून घटनेचा अधिक तपास ठाणेदार लोकेश कानसे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक इंगळे करीत आहे.

नैराश्येतून दोघांची आत्महत्या

मृतक युवकाची दुचाकी शहरातील साखरकर सभागृहाजवळ बेवारस स्थितीत आढळून आली. कदाचित स्वतःची दुचाकी तिथे ठेवून युवक महिलेच्या दुचाकीने घटनास्थळाकडे गेले असावे. विवाहाला समाज व कुटुंब मान्यता देणार नाही. कदाचित याच नैराश्येतून दोघांनी आत्महत्या केली असावी. उत्तरीय तपासणी अहवालात दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निदान झाले आहे.
- लोकेश कानसे,
पोलीस निरीक्षक भंडारा

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links