BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

13712 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

बस आणि ट्रेलरच्या अपघातात १७ जखमी... शहापूर उड्डाण पुलावरील घटना 

बस आणि ट्रेलरच्या अपघातात १७ जखमी

शहापूर उड्डाण पुलावरील घटना 

बसचा समोरील भाग क्षतिग्रस्त 

न्यूज कट्टा / भंडारा, २४ मार्च 

नागपूरकडून साकोली कडे जाणारी एसटी महामंडळाची साकोली डेपोची बस आणि बारामतीकडून ओडीसा कडे जाणारा ट्रेलर यांच्यात झालेल्या अपघातात १७ प्रवाशी जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजता दरम्यान शहापूर उड्डाण पुलावर घडली आहे. यात १५ जखमी, १ गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

नागपूरकडून साकोली कडे जाणारी साकोली डेपोची बस क्र. एम एच ४० एन ८६०३ ने ट्रेलर क्रमांक एम एच ४२ एq ०५७६ ला मागेहून जबर धडक दिली. यात बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही मात्र १५ प्रवाशी जखमी, २ गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमीमध्ये सुखचरण रामटेके( 45), सविता सुखचरण रामटेके( 4०), तोधीटोला, किर्नापूर जि. बालाघाट,  प्यारेलाल जोशी ( 7२) डव्वा पळसगाव, सडकअर्जुनी, ग्यानीदास जनबंधु ( 73) , मोजारी, लाखनी, तनवीर सय्यद (२२ )डव्वा पळसगाव, सडकअर्जुनी, विशाखा विजय राघोते (२०) सालेबर्डी, भंडारा शबाना असलम कुरेशी (38 ), भंडारा, अपूर्वा मोरेश्वर सेलोकर(24) खात रोड भंडारा अशी जखमींची नावे आहेत. काही जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर काहीना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातात किरकोळ जखमी झालेले जयश्री विजय लोखंडे(35 ), गोंदिया, विजय दिवाकर लोखंडे(४५) , गोंदिया , रवि सोनवाने( 32),कुसाडोंगरी, राजेंद्र फाये (34) गोंदिया , मीना सोनवाने(29) कुसाडोंगरी , नरेश मौझे(35)साकोली,  सायत्री मरकाम(20) तुन्दोनी, बालाघाट,  पूर्वा मोरेश्वर सेलोकर(२१) रुक्मिणी नगर, शुभांगी रमेश रामटेके(35) सावरी अशी आहेत. 
बस चालक नरेश मन्साराम मौजे हा अत्यंत वेगाने आणि हयगय करीत बस चालवीत होता त्यामुळे त्याचे बस वरील नियंत्रण सुटल्याचे सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींनी न्यूज कट्टाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

या अपघातात सामान्य रुग्णालयातील परिचारिका शुभांगी रामटेके या गंभीररीत्या जखमी झाल्या असून त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. आज ३ वाजता रुग्णालयात ड्युटी असल्याने त्या भंडाऱ्याला यायला निघाल्या होत्या. तसेच ओम सत्य साई विद्यालय, परसोडीची विद्यार्थिनी अपूर्वा मोरेश्वर सेलोकर हिला जबर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर जवाहरनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी पोहचले. प्रवाश्यांना त्वरित सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. जखमीवर उपचार सुरु आहे. 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links